श्रद्धा नंदागवळीचे यश

0
178

शिक्षण क्षेञातील मान्यवरांनी श्रध्दा नंदगवळी हीचे अभिनंदन…

विश्व हिंदी भाषण प्रतियोगीतामध्ये श्रध्दा नंदगवळी भारतातून द्वितीय…

निलंगा,-( प्रशांत साळुंके )- दिवस १४ सप्टेंबर हिंदी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विश्व हिंदी व्हीडीओ { व्ही.सी. } भाषण प्रतियोगीता बालोद्यान अमेरिका आयोजित संपूर्ण जगातून या स्पर्धेसाठी ६८ विद्यार्थ्यांची आँनलाईन भाषण प्रतियोगीता साठी निवड करण्यात आलेली होती.त्यातून महाराष्ट्रातील जवाहर नवोदय विद्यालय,लातूर मध्ये इयत्ता सातवी वर्गात शिकत असलेली श्रध्दाने भारतातून व्दितीय क्रमांक पटकावल्याने तीला तब्बल ७५ डाॅलरचे बक्षीस मिळाले आहे.या शैक्षणिकस्तरावरील श्रध्दाने हिंदी दिनानिमित्त उत्कृृष्ट भाषणामुळे कामगिरी केल्याने शिक्षण विभागातील व सोआक्ष समाजाकडून तीचे अभिनंदन होत आहे.

निलंगा तालुक्यातील ग्रामीण भागातील वसंतराव पाटील विद्यानिकेतन,औराद ( श.) येथे प्राथमिक शिक्षणाचे धडे तीने घेतलेली आहे.मातृृृभाषा मराठी असतानाही स्वत: च्या जिद्द व चिकाटीवर संपूर्ण जगातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झालेली असले तरी महाराष्ट्र राज्यात राहणीरा व मराठी मातृृभाषा असलेली श्रध्दाने भारतातून व्दितीय क्रमांक येण्याचा बहुमान मिळविला आहे.बालोद्यान अमेरिका व्दारे ७५ डाॅलरचे बक्षीस प्राप्त केली आहे.याअगोदर श्रध्दा हीने सातारा सैनिकी स्कूल प्रवेश परिक्षेत महाराष्ट्र राज्यातून द्वितीय आलेली होती.१५ आँगस्ट रोजी देशभक्ती पर गायलेल्या गाण्याची नोंद केंद्रीय विद्यालय संगठन समिती नवी दिल्लीने घेतलेली आहे.(कोविड-१९) लाॅकडाऊनच्या कालावधीत शाळा बंद असतानाही अभ्यासा व्यतिरिक्त विविध स्पर्धेत ६० पेक्षा जास्त प्रमाण-पञाची मानकरी ठरलेली आहे.

या यशाबद्दल सद्गगुरू गुरूबाबा महाराज औसेकर नाथ संस्थान ,औसा सद्गगुरू गहिनीनाथ महाराज औसेकर,सहअध्यक्ष विठ्ठल-रूक्मिणी,पंठरपूर,सौ.निता शर्मा अमेरिका प्राचार्य डाॅ.अजहर शेख सदस्य,भारतीय खाद्य निगम नवी दिल्ली,नवोदयचे प्राचार्य रमेशराव,बालोद्यान अमेरिकेचे महाराष्ट्राचे कार्यवाहक संजय शेंडगे,प्राचार्या डाॅ.शारदा जाधव,प्राचार्य सदाविजय आर्य,प्रा.दत्ता माने,मनोज पाटील,संकल्प कोचिंग क्लासेस व वसतीगृृह सावरीचे संचालक ज्ञानेश्वर पाटील,स्वप्निल होसुरे,सोनाली तोफीक,प्रा.डाॅ.सन्मुख मुच्छटे व माजी मुख्याध्यापक रघुनाथराव साळुंके,माजी केंद्रप्रमुख सुखवास साळुंके,मालूताई साळुंके,सुनिल साळुंके यांनी अभिनंदन केले आहे.

विश्व हिंदी भाषण प्रतियोगीतामध्ये श्रध्दा नंदगवळी यांनी भारतातून व्दितीय आल्याने ओ.बी.सी.राष्ट्रीय फाऊंडेशनचे मराठवाडा प्रसिध्दीप्रमुख तथा पञकार प्रशांत रघुनाथराव साळुंके यांनी यायशाबद्दल श्रध्दा हीला शुभेच्छा संदेश पाठवून अभिनंदन व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here