मुख्याध्यापकांची कार्यशाळा

0
306

उत्का (अ) येथील तालुकास्तरीय मुख्याध्यापकांची कार्यशाळा

बाला उपक्रम व बिहार पॅटर्न फळबाग लागवड समारोप कार्यक्रमास आ.अभिमन्यु पवार यांची उपस्थितीत संपन्न…

औसा,-(प्रतिनिधी)-औसा तालुक्यातील उत्का (अ), येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या तालुक्यातील मुख्याध्यापकांची कार्यशाळा व बिहार पॅटर्नअंतर्गत फळबाग लागवड समारोप कार्यक्रमास आ.अभिमन्यु पवार यांची उपस्थित होती .

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीसाठी शाळांना चांगली इमारत, स्वच्छतागृह, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, क्रीडा शिक्षकाची नेमणूक, क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणं गरजेचं असल्याचं सांगून खेळ व इतर कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धा तालुका व जिल्हा पातळीवर आयोजित कराव्यात तसेच शाळेभोवती बांबूच्या झाडांची लागवड करून बांबूचे कंपाउंड तयार करण्यात यावे. अशा सूचना दिल्या. “लातूर जिल्हा परिषदचे अध्यक्ष राहुल केंद्रे व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी बाला उपक्रमाच्या माध्यमातून एक अभिनव व दिशादर्शक उपक्रम हाती घेतला असून त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणाचा दर्जा मोठ्या प्रमाणावर सुधारणार आहे” असा विश्वास व्यक्त करून मतदारसंघात बाला उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दरवर्षी २५ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा आ.पवार यांनी शब्द दिला आहे.

यावेळी जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्षा सौ. भारतबाई सोळुंके, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल,भाजप जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, जि .प. सदस्य महेश पाटील, भागवत कांबळे, पं. स .सदस्य दिपक चाबुकस्वार, गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ, सरपंच सौ. महावरकर, शिक्षण अधिकारी भगवान फुलारी, गटशिक्षणाधिकारी सौ .अनुपमाताई भंडारे, शिक्षक पतसंस्था चेअरमन महादेव खिचडे, सचिव संजय जगताप, उपाध्यक्ष आयतबोने, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here