लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस

0
287

 

*जिल्ह्यात आता पर्यंत 906.9 मि. मी एवढा पाऊस,*

*गेल्या चोवीस तासात 66.9 मि.मी. पावसाची नोंद*

लातूर दि.28-(जि.मा.का.) जिल्ह्यात आज दिनांक 28 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 8 पर्यंत सरासरी 66.9 मिमी पावसाची नोंद झाली असून आज पर्यंत झालेला पाऊस हा जिल्हयाच्या वार्षिक सरासरीच्या 109 टक्के झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

जिल्हयात दिनांक 28 सप्टेंबर 2021 रोजी झालेले तालुका निहाय पर्जन्यमान तसेच 1 जून ते 28 सप्टेंबर 2021 पर्यंत झालेले एकूण पर्जन्यमान (तालुकानिहाय ) पुढील प्रमाणे आहे. (आकडेवारी मि.मी.मध्ये ) लातूर-82.7 (920.8) , औसा-64.4, (852.4) , रेणापूर 63.3, (985.5) ,अहमदपूर – 82.7 (1057.3) , चाकूर- 72. 0, (911.8), उदगीर-69.7 (972.9), जळकोट- 75.7 (1041.4),निलंगा-48.8 (779.2), देवणी- 45.0. (820.3) व शिरुर अनंतपाळ- 57.9 (820.3) मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आजपर्यंत झालेला पाऊस 906.9 मि.मी. इतका असून वार्षिक सरासरीच्या 109.5 टक्के आहे.

**

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here