*पुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तींची बचाव / सुटका करण्यासाठी तीन पथकांची नियुक्ती*
*रेणापूर व लातूर तालुक्यातील पुरामध्ये अडकलेल्या व्यक्तींची सुखरुप सुटका*
लातूर दि.28-(जि.मा.का) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण लातूर यांच्याकडून पुरात अडकेल्या व्यक्तींची सुटका/ बचाव करण्यासाठी स्थानिक पातळीवर 3 पथकांची नेमणूक करण्यात आली असल्यचे जिल्हा प्रशासनने कळविले आहे.
या पथकात रबर बोट ओबीएम मशिनसह इतर पुरांसबंधी आवश्यक साहित्य सामुग्रीसह अडकलेल्या ठिकाणी पाठविण्यात आले आहे.
या मध्ये पथक क्रमांक 1 : सारसा, देवळा, ता. रेणापूर. पथक प्रमुख व संपर्क क्र. श्री. कासले 9975719929, पथक क्र. 2 घणसरगाव ता. रेणापूर पथक प्रमुख व संपर्क श्री राठोड 8459482287, पथक क्र. 3 डिगोळ देशमुख ता. रेणापूर पथक प्रमुख व संपर्क श्री शिंदे 9975143101 / 9011032433 यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
मौजे डिगोळ देशमुख ता. रेणापूर जि. लातूर येथील पुरात अडकलेल्या 3 व्यक्तींची सुखरुप सुटका या पथकाकडून करण्यात आली. मौजे घनसावरगाव ता. रेणापूर जि. लातूर येथील पुरात अडकलेल्या 2 व्यक्तींची सुखरुप सुटका या पथकाकडून करण्यात आली. मौजे सारसा ता. जि. लातूर येथील पुरात अडकेल्या एकूण 40 व्यक्तीपैकी दुपारी 3-00 वाजेपर्यंत 25 व्यक्तींची सुखरुप सुटका केली असून उर्वरित अडकलेल्या 15 व्यक्तींची सुटका करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थिती लक्षात घेवून पुरात अडकलेल्या व्यक्तींचे मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफ टीमला पुणे येथून पाचारण करण्यात आले आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडून मौजे पोहरेगाव ता. रेणापूर येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तींचे स्थानिक बोटीने मदत व बचाव कार्य शक्य नसल्याने भारतीय वायु सेना पुणे येथून हेलिकॉप्टर (चॉपर) बोलावण्यात आलेले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी मांजरा व तेरणा नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे असे आवाहन केले आहे.
जिल्हयातील पूरजन्य परिस्थितीत प्रशासनास संपर्क साधावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे नियत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 02382-223002 असा आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,लातूर अतर्गत विविध यंत्रणामार्फत यामध्ये पोलिस विभाग ,अग्नीशमन विभाग,स्थानिक पातळीवरील यंत्रणेमार्फत पूरात अडकलेल्या व्यक्तींना मदत व बचाव कार्य करत आहेत.











