*तिरंगा रॅलीस उत्स्फुर्त प्रतिसाद*

0
215

 

राष्ट्रीय एकात्मता अबाधीत ठेवण्यासाठी भाजपा बांधील-आ. अभिमन्यू पवार

तिरंगा रॅलीस उत्स्फुर्त प्रतिसाद 

लातूर/प्रतिनिधी ः- सर्वधर्म समभाव जोपासत राष्ट्रीय एकात्मतेला प्राधान्य देण्यासाठी भाजपा सातत्याने प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून महापुरुषांच्या जयंतीनिमित्त भाजपा राष्ट्रीय एकात्मता अधिक जोपासली जावी याकरीता विविध कार्यक्रामचे आयोजन करीत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तिरंगा रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचला जाईल असा विश्वास आ. अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केला.

शहर जिल्हा भाजपाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमत्त सर्वप्रथम गांधी चौक येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर तिरंगा रॅली काढण्यात आलेली होती. सदर रॅलीच्या शुभारंभप्रसंगी आ. पवार बोलत होते. यावेळी भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, संघटन सरचिटणीस मनिष बंडेवार यांची उपस्थिती होती.

सर्व समाजघटकांना व जातींना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास हा नारा देत भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कार्यरत असल्याचे सांगून आ. पवार यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी राष्ट्रीय एकात्मतेचा जो संदेश दिला आहे तो संदेश अबाधित ठेऊन सर्वसामान्य लोकांपर्यंत हा संदेश पोहचविण्यासाठी भाजपा अविरतपणे कार्य करत असल्याचे सांगितले. सर्वधर्म समभाव ही संकल्पना प्रत्यक्षात रुजविण्यासाठी भाजपाने विशेष प्रयत्न करीत असून या अनुषंगाने प्रत्येक समाजघटकांपर्यंत विकासाची गंगा केंद्र सरकारच्या माध्यमातून पोहचविली जात आहे. यासोबतच राष्ट्र प्रथम या नुसार भाजपा राष्ट्राची एकात्मता अधिक दृढ करण्यासाठी विविध अभियान राबवत आहेत. याचाच एक भाग म्हणून आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे आ. अभिमन्यू पवार यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे तर सुत्रसंचलन संघटन सरचिटणीस मनिष बंडेवार यांनी केले. शहरातील गांधी चौक ते शिवाजी चौक या दरम्यान काढण्यात आलेल्या या तिरंगा रॅलीत शहर सरचिटणीस शिरिष कुलकर्णी, अ‍ॅड. दिग्वीजय काथवटे, भाजयुमोचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, रॅलीचे प्रभारी ज्योतिराम चिवडे, निखील गायकवाड, अ‍ॅड. प्रदिप मोरे, देविदास काळे, श्रीराम कुलकर्णी, किशोर जैन, दिगंबर माने, शिवा सिसोदिया, संजय गिर, रवि सुडे, सौ. शोभाताई पाटील, सतिष ठाकूर, विशाल हवा पाटील, सुरेश राठोड, स्वाती जाधव, शितल कुलकर्णी, वर्षा कुलकर्णी, कोंडेकर ताई, अ‍ॅड. पाटील ताई, आनंद कोरे, गणेश गोमचाळे, धोत्रे, व्यंकट वाघमारे, शैलेश स्वामी, देवानंद साळूंके , मुन्ना हाश्मी, अ‍ॅड. विजय अवचारे, रागिणी यादव, प्रगती डोळस, अफरीन खाँन, गणेश गोजमगुंडे, अमोल गित्ते, श्रीराम गोमारे, राजू सोनवणे, बाळू शिंदे, अनंत गायकवाड, अजय कोकाटे, कमलाकर डोके, संगम कोटलवार, संध्या जैन, महादेव कानगुले, रवि लवटे, संतोष तिवारी, धनंजय हाके, नयुम शेख, राज दहिवाले, वैभव डोंगरे, चैतन्य फिसके, प्रसाद भालेराव, अनिकेत शेंडगे, नितीन शेटकार, करुण हाके, किसन बडगिरे, भरत लोंढे, दयानंद ठोळेकर, अशोक पाटील, निर्मला कांबळे, रत्नमाला घोडके, काकासाहेब चौगुले, गोटू केंद्रे, भगवंत कुलकर्णी, दशरथ सगर, सतिष यादव, राजसिंग जुन्नी आदींसह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी वोकल फॉर लोकल यामध्ये विशेष योगदान दिलेल्या प्रमुख उद्योजकांचा प्रतिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here