लातूर-जहीराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या मसलगा { सोळ } नदीवरील पुलाची आ.विक्रम काळे यांनी केली पाहणी..
निलंगा,-( प्रशांत साळुंके )- लातूर-जहीराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक {752} मार्गावरील मसलगा {सोळ} नदीवरील पुलाची पाहणी आ.विक्रम काळे यांनी संबंधित कामावरील असलेल्या कर्मचार्यांशी संवाद साधून त्यांनी माहिती घेतली.

भारतातील पहिला पुल म्हणून या मसलगा { सोळ } नदीवरील अद्यावत बसवण्याचे काम पुर्णत्त्वाकडे चालू आहे.हा पुल मलेशियन ड्युरा सिस्टिमच्या अत्याधुनिक तंञज्ञानाच्या साहाय्याने बनविण्यात आल्याने त्याचे पूर्ण पार्ट हे बसवण्यात येत आहेत.हा पुल पूर्णत्त्वाकडे असल्याने विशेष महत्त्व वाढले आहे.हा पुल बसवण्यासाठी येथील कामावरील संबंधित इंजिनिअर व कर्मचार्यांचे विशेष कौतुक याकामाव्दारे होताना पाहावयास मिळत आहे.त्यामुळे अनेक पालकमंञी आणि आमदार यांनी मसलगा येथील भारतातील पहिला पुल असल्याने याची पाहणी करण्यासाठी याठिकाणी माहिती घेतली जात आहे. विशेषकरून,मसलगा { सोळ } नदीवरील पुलाची साईज 400 फूट लांबी मध्ये 03 पिल्लर वरती मलेशियन तंञज्ञानाचा वापर करून रेडिमेट बिम काॅलमच्या साहाय्याने पुलाची बांधणी करण्यात आलेली आहे.भारतातील पहिला पुल होत असल्याने केंद्रिय मंञी नितिन गडकरी यांचे विशेष आभार म्हणून आ.विक्रम काळे यांनी व्यक्त केले आहे.याकामावरती असलेले इंजिनिअर उपस्थित होते.
एकंदर,लातूर-जहीराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा वेग हा वाढला असल्याने वाहतुकदारांमध्ये आनंदाचे वातावरण सध्या दिसत आहे.त्यामुळे हा पुल पुर्णत्त्वाकडे त्याचे काम चालू असल्याने लवकरचं लोकार्पणाकडे आगेकूच करित असल्याचे पाहावयास मिळत आहे.











