ओला दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व निद्रिस्त आघाडी सरकार खडबडून जाग करण्यासाठी
आ.अभिमन्यू पवार यांची शेतकऱ्यांसह औसा ते तुळजापूर पदयात्रा..
निलंगा,-( प्रशांत साळुंके )-दि.16/10/2021 रोजीसकाळी 7.00 वाजता.औसा निवास्थान येथून पदयात्रेचे प्रस्थान बोरफळ येथे शेतकरी संवाद. तावशी ताड येथे शेतकरी संवाद.चिंचोली येथे शेतकरी संवाद. वांगजी येथे शेतकरी संवाद. आशिव ता. औसा येथे भोजन व शेतकरी संवाद.बोरफळ येथील साई पेट्रोल पंपावर पत्रकार परिषद घेण्यात आली .
Bत्यावेळी औश्याचे आमदार अभिमन्यू पवार म्हणाले की, दिलेले अनुदान तुटपुंजी चे आहे मी आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांला निवेदन दिले, मंत्रिमंडळात निवेदन दिले पण मुख्यमंत्री व राज्याच्या मंत्र्याला शेतकरी विषय धोरण नसल्यामुळे त्यांनी जे निवडणुकीत बोलले होते ते त्याची आठवण व्हावी आई तुळजाभवानीने सरकारला ते आठवण करून द्यावे व शेतकर्यांना न्याय मिळावा म्हणून मी तुळजापूरला पायी पदयात्रा काढली आहे. माननीय मुख्यमंत्री भाषणामध्ये शंभर वेळा आई तुळजाभवानी चे नाव काढतात, मुख्यमंत्र्याला सद्बुद्धी देऊन शेतकर्याला भरघोस मदत करावी म्हणून मी आई तुळजाभवानीला साखड घालणार आहे.
परवा जी शासनाने मदत जाहीर केली आहे ती अतिशय तुटपुंजी मदत आहे राज्य मध्ये जेंव्हा भाजप सरकार होते तेंव्हा कोल्हापूर सांगलीला पूर आला होता तेंव्हा सरकारने पॅकेज दिले होते तसेच पॅकेज द्यावे अशी आमदार अभिमन्यू पवार यांची मागणी आहे, पण सरकारने पॅकेज दिवाळीपर्यंत देऊ असे सांगितले आहे आणि अशा पद्धतीने शेतकर्यांच्या तोंडाला पाणी सोडायचे काम केले आहे. हेक्टरी दहा हजार रुपयांने काय होईल एकर मधून सोयाबीन काढण्यासाठीच पाच हजार रुपये द्यावे लागतात. आणि ही मदत शेतकर्यांचा जीव घेणारी आहे जीव वाचवणारी नाही
शेतकर्यांनी दिवाळी कशी करावी आणि रब्बीची पेरणी कशी करावी म्हणुन मदत वाढवावी म्हणून आमदार अभिमन्यू पवार हे तुळजापूरला आई तुळजाभवानीला साखड घालण्यासाठी पायी तुळजापूरला निघाले आहेत. या पदयात्रेमध्ये माजी खासदार सुनील गायकवाड, माजी आमदार पाशा पटेल, माजी नगराध्यक्ष किरण उटगे, लातूर जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, नगरसेवक गोपाळ धानुरे, नगरसेवक सुनील उटगे,संजय कुलकर्णी, सोनाली गोडबोले, यांच्या सहित अनेक कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.











