*जिल्हा बँक निवडणुकीत भाजपा*

0
297

लातूर जिल्‍हा बँक निवडणुकीच्‍या इतिहासात

पहिल्‍यांदाच भाजपाचे संपुर्ण पॅनल मैदानात

निवडणुक ताकतिने लढणार भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड

लातूर दि. १८– लातूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या संचालक मंडळाची निवडणूक येत्‍या २१ नोव्‍हेंबर २०२१ रोजी होत आहे. बँकेच्‍या इतिहासात पहिल्‍यांदाच संपूर्ण आणि सक्षम भारतीय जनता पार्टीने पॅनल उभा केला असून ही निवडणूक पुर्ण ताकतीने लढली जाणार असल्‍याची माहिती भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी दिली.

लातूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बॅकेच्‍या पंचवार्षिक संचालक मंडळाच्‍या निवडणूकीची धामधुम सुरू झाली असून आतापर्यंत सत्‍ताधारी सहकार महर्षीनी वेगवेगळया पध्‍दतीचा अवलंब करून बँकेची निवडणुक बिनविरोध काढण्‍याचा प्रयत्‍न केला. मतदारांना मतदानाचा हक्‍क बजावण्‍याची संधी मिळू दिली नाही. शेतकऱ्यांच्‍या हितासाठी काम करण्‍याची अनेकांना ईच्‍छा असतानाही स्‍वप्‍नांचा चुराडा करण्‍याचा प्रयत्‍न प्रत्‍येक निवडणूकीत करण्‍यात आला.

येत्‍या २१ नोव्‍हेंबर रोजी लातूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेची संचालक मंडळाच्‍या १९ जागेसाठी निवडणुक होत आहे. या निवडणूकीसाठी १८ ऑक्‍टोबर २०२१ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्‍याच्‍या शेवटच्‍या  दिवशी भाजपाच्‍या वतीने सर्वच्‍या सर्व जागेवर सक्षम उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करून जिल्‍हा बॅकेच्‍या  इतिहासात पहिल्‍यांदाच मतदारांना समर्थ पर्याय निर्माण करून दिला आहे.

जिल्‍हा बँकेच्‍या निवडणूकीसाठी आजपर्यंत कधीच निवडणूक झाली नाही आणि सत्‍ताधाऱ्यांनी होवू दिली नाही. भाजपाने पाहिल्‍यांदाच सर्वच्‍या सर्व जागेवर उमेदवारी अर्ज दाखल केले असल्‍याचे सांगून आ. रमेशअप्‍पा  कराड म्‍हणाले की, सत्‍ताधारी सहकार महर्षींना लोकशाही मान्‍य असेल तर त्‍यांनी बँकेची ही निवडणूक लोकशाही पध्‍दतीने होवू द्यावी. लोकशाही पध्‍दतीने मैदानात उतरून लढावे. उमेदवारी अर्जाच्‍या  छाननीत आडवा आणि जिरवाची भुमिका घेवू नये. मतदारांना त्‍यांच्‍या मतदानाचा हक्‍क बजावू द्यावा.

भाजपाचे नेते माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, खा. सुधाकर शृंगारे, आ. अभिमन्‍यू   पवार, प्रदेश उपाध्‍यक्ष विनायकराव पाटील, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्‍यक्ष सुधाकर भालेराव, जेष्‍ठ मार्गदर्शक गोविंदअण्‍णा केंद्रे, प्रदेश प्रवक्‍ते गणेशदादा हाके, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, शिवाजीराव पाटील कव्‍हेकर, कृषीमुल्‍य आयोगाचे माजी अध्‍यक्ष पाशा पटेल, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, जिपचे अध्‍यक्ष राहूल केंद्रे यांच्‍यासह जिल्‍हयातील भाजपाचे सर्व प्रमुखांच्‍या संयुक्‍त निर्णयाने भारतीय जनता पार्टी जिल्‍हा बँकेची ही निवडणूक पुर्ण ताकतीने लढणार आहे अशीही माहिती आ. रमेशअप्‍पा कराड यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here