विलास साखर कारखान्याच्या अध्यक्षा वैशालीताई देशमुख यांची भूसणी बॅरेजला भेट
पालकमंत्री ना. देशमुख यांनी निर्देश दिल्या नंतर जलसंपदा विभागाकडून युध्दपातळीवर कार्यवाही
गेट दुरूस्त करून वाहून जाणारे पाणी थांबवले..
लातूर,-(प्रतिनिधी) -तावरजा नदीवरील भुसणी बॅरेजचे एक गेट व्यवस्थित बसत नसल्याने काही प्रमाणात पाणी वाहून जात असल्याचे समजताच विलास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती वैशाली विलासराव देशमुख यांनी गुरूवारी सकाळी त्या ठिकाणी तात्काळ जाऊन पाहणी केली.

जिल्हयाचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांना या संदर्भात माहीती देण्यात आली असता त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून तात्काळ गेट दूरूस्तीचे निर्देश दिले. त्यानंतर संबधीत विभागाकडून युध्दपातळीवर कार्यवाही होवून दुपार पर्यंत वाहून जाणारे पाणी थांबवण्यात यश आले आहे.
या संदर्भातील अधिक माहिती अशी की, भूसणी बॅरेजचे एक गेट ऑपरेट होत नसल्यामूळे तेथून पाणी वाहून जात असल्याची माहिती विलास सहकारी साखर कारखाना अध्यक्षा श्रीमती वैशाली विलासराव देशमुख यांना मिळताच नियोजन समितीचे सदस्य विजय देशमुख यांच्यासह गुरूवारी सकाळी बॅरेजवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पालकमंत्री ना. अमित देशमुख यांना या संदर्भातील माहिती कळविण्यात आली त्यांनी जलसंपदा विभागास तात्काळ संपर्क केला, पाऊस थांबलेला असल्यामुळे बॅरेजमध्ये वाहून जाणारे पाणी तात्काळ थांबायला हवे असे सांगून गेट दुरूस्तीसाठी युध्द पातळीवर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री जगताप यांनीही यांञिकी विभागाला सोबत घेऊन यावर तातडीने कार्यवाही सुरू केली. दुपार पर्यंत वाहून जाणारे पाणी थांबवण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. सर्वच बॅरेजच्या ठिकाणी दुरूस्तीची काम हाती घेऊन यापूढे असे प्रकार घडणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल असे त्यांनी सांगितले.

भूसणी बॅरेजवर विलास सहकारी साखर कारखाना अध्यक्षा श्रीमती वैशाली विलासराव देशमुख यांनी भेट दिल्यानंतर, पालकमंत्री ना. देशमुख यांच्याकडून यासंदर्भात दखल घेण्यात येऊन , जलसंपदा विभागला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या, जलसंपदा विभागाकडूनही युध्द पातळीवर बॅरेजची दुरूस्ती होवून वाहून जाणारे पाणी थांबवल्यामूळे शेतकरी वर्गातून आनंद आणि समाधान व्यक्त केल जात आहे.
विलास कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी भुसणी बॅरेजला भेट दिली तेंव्हा त्यांच्या समवेत, नियोजन समिती सदस्य विजय देशमुख बाभळगावचे उपसरपंच गोविंद देशमुख, भुसणीचे सरपंच वीरभद्र दगडू स्वामी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित जगताप, जलसंपदा यांत्रिकी विभागाचे राऊत, इंजिनिअर विभागाचे जाडकर, राजकुमार मुक्तापुरे, अंतेश्वर साखरे, राज पतंगे, शेतकरी उमेश गुरमे, शेतकरी शिवाजी भारती आदीसह संबंधित विभागाचे अधिकारी, परिसरातील नागरिक उपस्थित होते.











