महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची नियुक्ती..
पुणे,-( प्रतिनिधी )- राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली असून,त्या गुरूवारी पदभार सांभाळतील.
रूपाली चाकणकर या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आहेत.महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून हे पद रिक्त होते.ते अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात गेले.












