*जय श्रीराम*
*अभिनंदन*
*स्वरकमलाकर*
आ. संगीत महामहोपाध्याय सुरमणी डॉ श्री कमलाकर मुकुंदराव परळीकर सर तुमचे मनःपूर्वक
*अभिनंदन*
आणी
तुमच्या पुढील पुरस्कार रुपी सन्मानाला मनापासून खूप खूप शुभेच्छा
त्रिवार वंदन🙏🙏🙏
सर हा सन्मान तुमच्या त्यागी व्यक्तिमत्वाचा आहे
आणी
त्यागात सुख सामावलेले असतेच असते हा निसर्गनियम आहे.

आयुष्यातील संगीत प्रवासात तुम्ही जीवन हि कला मानून पूर्णपुरुषाच्या आशीर्वादाने समाजातील पुढील पिढीसमोर एक अनोखा आदर्श निर्माण केलात आणी त्यामुळेच
मुंबई येथील
दादर माटुंगा कल्चरल सेन्टरला
तुमच्या संगीत क्षेत्रातील कार्याची दखल घ्यावी लागली आणि सर्वोत्तम असा
जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
हि सर्व संगीतातील विद्यार्थी आणी रसिकांसाठी आनंदाची
परभणी साठी पर्वणी ठरली
तुमच्या जीवनातील इतक्या वर्षाची समर्पण रुपी तपश्चर्या आहे ती अनेक पुरस्काराच्या माध्यमातून फळाला आली
तुम्ही साक्षात ज्ञानरुपी संगीत देवतेचे साक्षात चालते बोलते मंदिर
आणि
त्या मंदिरातील दैवत देखील तुम्हीच आहात
तुका राम हि अवस्था
हळू हळू राम दास अश्या संकल्पनेत बदलते
आणी त्याचे तुम्ही मूर्तिमंत उदाहरण आहात
आणी या उच्चतम उंची वर पोहचले की तन आणि मनाच्या भक्तीतून सुरांच्या आणि तालाच्या माध्यमातून तबला,संवादिनी, व तानपुरा यांच्या साथीतून आणी मंजिरीच्या (टाळ) गोड नाजूक नादातून जुळून आलेल्या योगरुपी अवस्थेतूनआणी प्रतिभा संपन्न गळ्यातून कलाविष्कार बाहेर पडतो रसिकभक्तांच्या मनाची पकड घेतो
*राम गावा राम ध्यावा*
*राम जीविचा विसावा*,
*ध्यान करू जाता मनहरपले*,
*माझे सर्व जाओ*
*तुझे नाम राहो*,
*काहो राम माये दुरी धरियेलें*,
*देव जवळी अंतरी* ,
*संसारीचे दुःख मज वाटे सुख पाहता मुख राघवाचे* ,
हि एकरूपता प्राप्त झाली की सगळ्यांच्या बद्दल मनात कळवळा निर्माण होतो आणि पसायदानरुपी आर्ततेने मागण मागितल जाते ते म्हणजे.

*कल्याण करी रामराया*
हि सगळी अविष्कार निर्मिती तुमच्या सारख्या तन,मन, आणी धनाने उंची गाठलेल्या साधक अवस्थेतून महंत झालेल्या
श्री समर्थ रामदास स्वामी गौरव पुरस्काराने सन्मानित श्री समर्थ भक्तालाच
श्री समर्थ वाङ्मयाला सामर्थ्यवान सुरांमध्ये गुंफण्याचे सामर्थ्य लाभते ते पूर्णपुरुष असलेल्या
महानगायक,साहित्यिक, बंदिशीकार,
रचनाकार आणी थोर संगीतकार

*श्रीस्वरकमलाकरालाच*
श्री ज्ञानसरस्वती माता बासर, राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज श्री क्षेत्र जांब समर्थ
श्री गुरूंच्या असीम कृपेने
सुरमणी श्री कमलाकर परळीकर यांच्या सुरांच्या सानिध्यात त्यांच्या सोबतशास्त्रीयसंगीत,उपशास्त्रीयसंगीतअभंगवाणी,गीतरामायण ,हिंदी, मराठी उर्दू गझल आणि
श्री समर्थ रामदास स्वामींची अभंगवाणी अश्या प्रकारच्या अनेक मैफिलीतून, कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या गंधर्व गायनाला यशस्वी तबला साथीदार म्हणून साजेशी
तबला साथ करण्याचे भाग्य लाभले त्यांचा मोलाचा सहवास लाभला आणि त्यामुळेच व्यक्त होता आले
वरील भावना व्यक्त करताना
*ज्योतीने तेजाची आरती*
करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे
आपल्या सर्वांचा
तबला साथीदार
संतचरणरज श्री समर्थ रामदासानुदास
तालदास श्री गिरीश वसंतराव सातोनकर तबला वादक संस्थापक अध्यक्ष श्री समर्थ रामदास स्वामी प्रतिष्ठान
लेखन: गिरीश सातोनकर
औरंगाबाद
9423393732
*राष्ट्राच्या कल्याणार्थ*
*जय जय रघुवीर समर्थ*👏











