रस्ते वाहतूक व महामार्गमंञी नितिन गडकरी आणि राज्यमंञी व्ही.के.सिंग यांचा विठ्ठल-रूक्मिणी संस्थानचे सहअध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रतिमा,शाल देऊन यथोचित सत्कार संपन्न..
निलंगा,-( प्रशांत साळुंके )-पंठरपूर येथील केंद्राच्या 13 महामार्ग प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यानिमित्त रस्ते वाहतूक व महामार्गमंञी नितीन गडकरी आणि राज्यमंञी व्ही.के.सिंह यांचा सत्कार विठ्ठल-रूक्मिणी संस्थानचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी विठ्ठल-रूक्मिणीची प्रतिमा व शाल देऊन सत्कार करण्यात आला आहे.

रस्ते वाहतूक व महामार्गमंञी नितीन गडकरी आणि राज्यमंञी व्ही.के.सिंग सत्काराप्रसंगी ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी विठ्ठल-रुक्मिणी संस्थानची माहिती सांगितली.तसेच, केंद्राच्या 13 महामार्ग प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडल्याने विश्वस्त समितिकडून आभार व्यक्त करण्यात आले आहे.











