*पाशा पटेल यांची मागणी*

0
451

तर चिकन आयातीची परवानगी द्या- राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार पाशा पटेल

निलंगा,-( प्रतिनिधी)- शेतीतील सोयाबीनचा दर प्रतिक्विंटलसाठी चार हजारांपर्यंतच नियंञित करावा,अशी मागणी करून पोल्ट्री ब्रिडर्स असोशिएशनने सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोलण्याचे काम केले आहे.तसेच,जेनेटाक माॅडिफाइड सीडस पेंड आयातीची परवानगी केंद्राकडे मागितली आहे.ही संघटना केंद्र शासनावर दबाव टाकून सोयाबीन उत्पादकांना अडचणीत आणण्याचे षडयंञ करीत आहे.केंद्राने त्यांना पेंड आयातीची परवानगी दिली तर आम्हालाही चिकन आयातीची परवानगी द्यावी,अशी मागणी केंद्राकडे करण्यात येईल,अशी माहिती राज्य कृषी आयोगाचे माजी अध्यक्ष तथा माजी आ.पाशा पटेल यांनी दिली.
पोल्ट्री ब्रिडर्स असोसिएशनचे अध्यक्ष बहादूर अली दानी केंद्रीय पशुसंवर्धनमंञी पुरेषोत्तम रूपाला यांना पञ लिहिले आहे.सोयाबीनला प्रतिक्विंटलला दोन हजार नऊशे पन्नास रूपये हमीभाव आहे.परंतु,बाजारात प्रतिक्विंटल सहा हजार ते सहा हजार दोनशे रूपये दर मिळत आहे.त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पोल्ट्री उद्योगाचे नुकसान होणार आहे,त्यामुळे सोयाबीनचे दर जास्तीत जास्त चार हजार रूपये क्विंटल नियंञित करण्यासाठी केंद्राने पावले उचलावीत,अशी मागणी त्यांनी या पञाव्दारे केले आहे.त्यामुळे देशभरातील सोयाबीन उत्पादकांत असंतोष आहे.

———————————————————————

विषाची बीजे पेरू नका…
या पञासंदर्भात पाशा पटेल म्हणाले,” यंदाच्या अतिवृृष्टी आणि पुरपरिस्थितीमुळे सोयाबीन उत्पादक अडचणीत आहे.दोन पैसे अधिक मिळणे हा त्याचा अधिकार आहे.पोल्ट्रीवाले सरकार दबाव आणून सोयाबीनचा दर चार हजार रूपयांपर्यंत नियंञित करण्याचे षडयंञ रचत आहेत.आता आम्हीही केंद्राला सांगू,देशातील चिकन आम्हाला परवडत नाही.चिकन आयातीची परवानगी द्यावी, असे चिकन निम्म्या किंमतीत मिळेल.असे झाले तर पोल्ट्री उद्योग कसा चालेल हेही पाहू.पोल्ट्री असो किंवा सोयाबीन उत्पादक सारखेच आहेत.सध्या भाव नाही म्हणून सोयाबीन टप्प्या टप्प्याने बाजारात येत आहे.पोल्ट्रीवाल्यांनी अडचणी आणल्या तर सोयाबीनच बाजारात आणू नका,असे आवाहन केले जाईल,तसे झाले तर तुमचे जगणे मुश्कील होईल.विषाची बीजे पेरू नका.शेतकर्‍यांना ताटात माती कालवू नका” असेही पाशा पटेल यांनी माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here