संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रम साजरे
लातूर : हाळी खुर्द (ता.चाकूर) येथील जिल्हा परिषद शाळेत एकल महिला मंडळ, बचत गट व सक्षम महिला मंडळाच्या वतीने संविधान दिनानिमित्ताने संविधान प्रतिमा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गावातील महिला व शाळेच्या विद्यार्थांनी गावातून संविधान फेरी काढली. यावेळी भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.

श्रीमती नंदा नरहरे यांनी संविधानाचे वाचन केले. बचत गटाच्या महिलांनी शाळेतील शिक्षकांचा सत्कार केला. या कार्यक्रमास एकल महिला संघटनेच्या तालुका सचिव आम्रपाली तिगोटे, सुरेखा मसुरे, सक्षम महिला मंडळाच्या अध्यक्ष अफसना शेख, सचिव मेहराजबी शेख, वनिता शिंदे, मुख्याध्यापक बालाजी पाटील, नागनाथ किनगावकर, रामराव हावडे, आत्माराम बिरादार, अंगद सूर्यवंशी, राधिका रेड्डी, कल्पना देशपांडे, नंदा नरहरे, रोकडे अनुसया रोकडे, करुणा शिंदे, सुनिता राडकर यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.











