*अजितदादा पवारांचा आशीयानावर सत्कार*

0
309

 उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा लातूरात देशमुख परिवाराच्या निवासस्थानी सत्कार..

उपमुख्यमंत्री पवार यांची आशियाना निवासस्थानी भेट लोकनेते विलासराव देशमुख यांच्या आठवणींना दिला उजाळा

लातूर,- राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार हे लातूर दौऱ्यावर शनिवारी आले असता त्यांनी लातूरात माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या आशियाना निवासस्थानी सदिच्छा भेट दिली त्यांचा यावेळी देशमुख परिवाराच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख व आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते शाल श्रीफळ व लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांचे आत्मचरित्र पुस्तक देवुन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळ त्यांच्या कार्याची कौतुक करत आठवणींना उजाळा दिला अनेक विषयवार भाष्य करत राज्यातील अनेक मुख्यमंत्री कर्तबगार लोकांच्या कार्याला वाहून निर्णय घेण्यात आघाडीवर होते त्यात लातूरचे लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांचा नावाचा उल्लेख करून कार्यतत्पर लोकांच्या सेवे मध्ये त्यांनी कधीच मागे बघितले नाही सतत लोकांच्या मनात राहणारे व्यक्तिमत्व लातूरचे सुपुत्र विलासराव देशमुख होते असे यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी येथे बोलताना व्यक्त केले ते शनिवारी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी प्रथम आशियाना निवासस्थानी भेट दिली तेथे नाष्टा घेत असताना गप्पा मारल्या यावेळी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख, राज्यमंत्री ना. संजय बनसोडे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार लांडे उपस्थित होते.

यावेळी आशियाना निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सत्कार लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा लातूरचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी आमदार अँड त्रिंबक जी भिसे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, रेणा साखर चे चेअरमन सर्जेराव मोरे, मारुती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन गणपत बाजूलगे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव,ट्वेण्टी वन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, मारुती चे व्हॉईस चेअरमन शाम भोसले, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, रेणा साखर चे व्हॉईस चेअरमन अनंतराव देशमुख, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन अँड श्रीपतराव काकडे, रेणा चे माजी अध्यक्ष यशवंतराव पाटील, जिल्हाधिकारी बी पृथ्वीराज मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महापालिका आयुक्त मित्तल, हारिराम कुलकर्णी, रमेश सूर्यवंशी, सचिन दाताळ ,संभाजी रेड्डी, सूरज चव्हान, प्रशांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली आशियाना परिसराची पाहणी

यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आशियाना निवासस्थानी येथील गार्डन, वृक्ष, लोकासाठी अभ्यागत कक्ष आदीची पाहणी करून अतिशय चांगले कार्य देशमुख परीवार करीत आहेत असा उल्लेख त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here