*जनजागृती दिंडी*

0
231

देहदान अवयवदान नेत्रदान महादान..

आनंदवाडी येथील महिलांनी काढली श्रमसंस्कार व अवयदान जनजागृती साठी दिंडी..

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने आनंदवाडी येथील फक्त आणि फक्त महिलांनी केला मातृशक्तीचा जागर व सात दिवस केला अखंड हरिनाम सप्ताह.

आनंदवाडीचा आदर्श घेवून किर्तनासाठी आलेले ह.भ.प.बरुरे महाराजांनी व त्यांच्या सहचारिणी या दापंत्याचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प..

किर्तनाच्या माध्यमातून करणार अवयवदानाची जनजागृती..

निलंगा,-( प्रशांत साळुंके )- मरावे परी किर्ती रुपे उरावे या उक्ती प्रमाणे लातूर येथील येथील रहिवासी व असलेले व जन सेवा हीच ईश्वर सेवा हा वसा घेवून वारकरी सांप्रदाय चालवणारे कथा किर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन व जनजागृती ते करत असतात.ग्रामीण व शहरी भागात संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी किर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.त्यांच्या सोबातच त्यांच्या त्यांच्या सहचारिणी बरुरेताईनी मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प केला.आपले शरीर कुणाच्या तरी कामी आले पाहीजे.मृत्यूनंतरही हा देह मानवाच्या कल्यासाठी उपयोगी पडावा. ही प्रेरणा घेवूनच ह.भ.प.बरुरे महाराज व बरुरेताई दापंत्यानी अवयवदानाचा संकल्प केला आहे.मृत्यूनंतर आपण आपल्या मौल्यवान अशा देहाची राखरांगोळी करून टाकतो.त्यापेक्षा अवयवदानामुळे गरजू लोकांना मदत होत असेल व मरणाच्या दारातून एखादी व्यक्ती परत येत असेल तर अवयवादानासारखे महान कार्य नाही अशा विचार ह.भ.प.बरुरे महाराजांनी यांनी व्यक्त केला.आपले आयुष्य आपला देह मरणोत्तर इतराच्या भल्यासाठी जावा अशा विचार करणारी देवमाणसं याच्या माध्यमातून पाहायला मिळाली.
या त्यांच्या महान कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.निर्मल ग्राम व आदर्श गाव आनंदवाडी- [गौर ]ता.निलंगा यांच्या प्रेरणेतून अवयवदान व देहदान या क्षेत्रात काम करणारे आनंदवाडी (गौर ) येथील ज्ञानोबा पंढारी चामे यांच्या मदतीने त्यांनी ह.भ.प.बरुरे महाराज व ताईनी अवयवदानाचा फार्म भरून दिला. याप्रसंगी आनंदवाडी व गौर यासह पंचक्रोशीतील महिला व नागरिक किर्तनासाठी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here