पुष्पा त्रिलोकेकर यांच्या जाण्याने मराठी पत्रकारितेचे एक लखलखते पर्व अस्त पावले आहे. एकाच वेळी हळुवार ललित लेखन आणि अन्यायाविरुद्ध उभा राहिल्यावर जळजळीत लेखन त्यांची लेखणी करू शकत होती.साप्ताहिके, रविवार पुरवण्या यामध्ये पुष्पाताईंनी किती विविधांगी आणि विपुल लेखन केले याची गणतीच नाही.
पत्रकारांच्या नवीन पिढीला पुष्पाताईंची एक वेगळी ओळख करून दिली पाहिजे. पत्रकारिता हे जेव्हा पुरुष मंडळींचे अभयारण्य होते तेव्हा पुष्पाताई वार्ताहर, उपसंपादक यांपासून ते रात्रपाळीच्या प्रमुख म्हणून दैनिक मराठा मध्ये पुरुष सहकारी बहुसंख्येने असताना बिनधास्त काम करीत होत्या. खरेतर त्यांनी आत्मचरित्र लिहायला हवे होते.
पुष्पाताईंच्या कार्याची पुरेशी दखल पत्रसृष्टीने घेतली नाही, त्यांना मराठानंतर मान्यवर वृत्तपत्रात संधी मिळाली नाही किंवा हवे तेवढे स्वास्थ मिळू शकले नाही.उत्तरायष्यात मित्रवर्य प्रदीप शर्मा यांच्यासारख्या समजुतदार जीवनसाथी मिळाला हा एक सुयोग होय.
आदरणीय पुष्पाताईंना श्रद्धांजली











