*बाभळगावची वेळ अमावस्या*

0
276

*बाभळगाव येथे देशमुख कुटुंबाच्या वतीने दर्श वेळ अमावस्या निमित्त शेतात काळया आईंची केली पूजा*

*Kovid १९ च्या वाढता संसर्ग बघता साधेपणाने केली वेळ आमावस्या साजरी*

लातूर,-( प्रतिनिधी)-

भारतासारख्या कृषी प्रधान देशात कृषिशी निगडित अनेक सनवार असतात असाच एक मोठा सण म्हणजे वेळ अमावास्या त्यासाठी दरवर्षी बाभळगाव येथे देशमुख कुटुंबाच्या वतीने मोठया प्रमाणावर वेळ अमावस्या साजरी करण्याची परंपरा आहे मात्र गेली दोन वर्षांपासून देशात राज्यात कोविड चा संसर्ग वाढत असल्याने यावर्षा बाभळगाव येथे रविवारी वेळ आमावास्या निमित्ताने कुठलीही गर्दी न करता शेतात काळया आईची पूजा राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब व त्यांच्या पत्नी सौ सुवर्णाताई दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आली

वेळ आमवास्या सण म्हणजे या सणाला येळवस असे म्हणतात या सणाला लातूर उस्मानाबाद जिल्हयात खूप महत्व आहे आपल्या शेतातल्या काळया आईचे ऋण फेडण्यासाठी तिची मनोभावे पूजा केली जाते गावातली सर्व लहान थोर शेतात वन भोजनाचा आनंद लुटत असतात सर्वजण शेतात जात असल्याने लातूर शहर व जिल्ह्यात अघोषित संचारबंदी लागल्यासारखी स्थिती या जिल्ह्यात असते.

*बाभळगाव ची वेळ आमावस्या आणि देशमुख कुटुंब*

बाभळगाव येथील देशमुख कुटुंबाच्या वतीने दर्शवेळ अमावस्या निमित्त शेतात मोठया प्रमाणावर वेळ आमवस्या साजरी करण्याची परंपरा आहे लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात वेळ अमावस्या निमित्त राज्यभरातून हजारो लोक या दिवशी वन भोजनाचा आस्वाद घ्यायला लोक बाभळगाव येथे यायचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख, पालकमंत्री ना अमित विलासराव देशमुख, आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत करण्याची परंपरा आहे ते आजही सुरु आहे पण गेली दोन वर्ष राज्यात कोरोनाचे संकट व तिसऱ्या लाटेची वाढते रुग्ण पाहता रविवारी २ जानेवारी रोजी बाभळगाव येथे शेतात राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या पत्नी सौ सुवर्णा ताई दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते काळया आईची पूजा करण्यात आली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here