*विनम्र श्रद्धांजली*

0
288

सलाम सिंधुताई

खूप दिवस झालेत.सिंधुताई सपकाळ आमचे घरी जळगावी आल्या होत्या.माझे काका दलितमित्र भास्कराव तायडे त्यावेळी जळगाव येथे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते.समाजसेवेत आणि धम्म कार्यातही ते अग्रेसर होते.कविताही लिहायचेत.मी जी काही कविता लिहितोय त्याची प्रेरणा काका आहेत.घर पुस्तकांनी भरलेले होते.1961 पासूनचे ‘धर्मयुग’चे हिंदी साहित्याचे अंक मला काकांच्या ग्रथांलयात लहानपणीच वाचायला मिळाले होते.भा. रा. तांबे यांची “पाणपोई” मी या घरातच वाचली.हरीवंशराय बच्चन यांची “मधुशाला” आणि प्रेमचंद यांची “गोदान”ही इथेच वाचली.माझी पहिली कविताही मी याच घरात 1978 ला लिहिली.या घरात काकांच्या भेटीसाठी सिंधुताई आल्या होत्या.माझ्या काकुंच्या खांद्यावर त्या हात ठेवून उभ्या आहेत.माझे डोळे आठवणींनी भरून आले आहेत.आज काका नाहीत.काकू एकट्याच आहेत.त्यांची चार मुले हयात नाहीत.काकांच्या पेन्शनवर त्यांचे जगणे सुरू आहे. कधीकाळी हे आमचे घर माणसांनी,नातेवाईकांनी भरलेले,बहरलेले असायचे.आज हेच घर केव्हा कोसळेल सांगता येत नाही.1961 ला माझे आजोबांनी हे घर बांधले होते.बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा आणि प्रेरणा घेऊन शिक्षणाने घर समृद्धही झाले.पण पांगलेही.जो तो आपापले घरटे आणि आकाश घेऊन या घरापास्नं दूर स्थिरावलाय.परवा काकांच्या घरी गेलो होतो.आठवण म्हणून काका , काकुंचा आणि सिंधुताईंचा फोटो घेऊन आलो होतो.सिंधुताई अनाथांची माऊली.अत्यंत प्रतिकुल परिस्थीशी संघर्ष करीत प्रेरणास्तंभ आज झाली आहे .या माऊलीस प्रणाम.सलाम पद्मश्री सिंधुताई!
विनम्र श्रद्धांजली.

 

शशिकांत हिंगोणेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here