अनाथांच्या आई सिंधुताई सपकाळ यांना लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यानी वाहिली श्रध्दांजली…
निलंगा,-(प्रशांत साळुंके)-
माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यानी भाजपच्या जन संपर्क कार्यालयात सिंधुताई सपकाळ याना कार्यकर्त्यांसह श्रध्दांजली वाहिली आहे.
लाखो अनाथांची आई सिंधुताई सपकाळ यांचे पुणे येथे अचानक -हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.त्याना निलंगा येथील भाजपा जनसेवक संपर्क कार्यालयात माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यानी अनेक कार्यकर्त्यांसह श्रध्दांजली वाहिली व सिंधूताई सपकाळ यांच्या आठवणीला उजाळा दिला.
यावेळी भाजपा शहरध्यक्ष विरभद्र स्वामी, चेअरमन दगडू सोळुंके,शेषराव ममाळे,माधव पाटील,रमेश सातपुते,शरद पेठकर,शफीक शेख,डॉ ज्ञानेश्वर कदम,विष्णू ढेरे,सुमित इनानी,यांच्या सह अनेक शहरातील व ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.











