अतिवृृष्टीने नुकसान झालेल्या तेरणा,मांजरा,तावरजा नदीकाठच्या शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुन्हा संघर्ष करणार
माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा इशारा..
निलंगा,-( प्रशांत साळुंके )-खरीप हंगामातील सोयाबीन पीकांसह अन्य पीके अतिवृृष्टीच्या आसमानी आणि सुलतानी संकटांमुळे तेरणा,मांजरा,तावरजा नदीकाठच्या शेतकर्यांच्या पीकांच्या बनिमी वाहून गेल्याने अतोनात नुकसान झाल्याने भरीव मदत अद्यापही राज्य सरकारने दिले नसल्याने संतापाची लाठ निर्माण झाली आहे.त्यामुळे आपण येणार्या काळात सर्वसामान्य शेतकर्यांच्या हितासाठी नदीकाठच्या शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाल्याने भरीव मदत प्राप्त होण्यासाठी संघर्ष करून न्याय देणार असल्याचे सांगितले.तसेच, माजी मुख्यमंञी तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दौरा करून शेतकर्यांच्या व्यथा ऐकून घेऊन आपण पाठीशी असल्याचे नमुद केले.शेतकर्यांच्या न्यायहक्कासाठी यापुठेही नुकसानीची मोबदला भरीव मदत अद्यापही शेतकर्याला प्राप्त झाली नसल्याने आपण प्रत्येक गावात जाऊन शेतकर्यांशी संवाद साधून पुढील न्यायहक्कासाठी संघर्षाची दिशा ढरवण्यात येईल असे माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या बैढकीत कार्यकर्त्यां समावेत बोलताना व्यक्त केले.

याप्रसंगी,जिल्हाध्यक्ष तथा आ.रमेशअप्पा कराड,आ.अभिमन्यु पवार,जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे,जिल्हा परिषद उपाध्यक्ष भारतबाई सोळुंके,प्रदेश सचिव दिलीपराव देशमुख,संघटन सरचिटणीस संजय दोरवे,सभापती रोहिदास वाघमारे,सभापती गोविंद चिलकुरे,जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीतील सदस्य,पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोढ्या संख्येने उपस्थित होते.











