“महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे, मनोरंजन पार्क यांच्या बाबतीत सरकारचा दुजाभाव “
गेली दोन वर्षेपासून संपूर्ण जग कोरोनामुळे त्रस्त झालेलं आहे मागील दोन लाट संपतात न संपतात तोपर्यंत तिसऱ्या लाटेची चाहुल या ओमीक्रॉन मुळे लागलेली दिसत आहे अश्यातच देशात आणि राज्यात सरकार द्वारे विविध निर्बंधांच्या माध्यमातून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी चे प्रयत्न चालू आहेत राज्यात दिनांक 8 जानेवारी रोजी काढलेल्या परिपत्रकात शासनाने विविध निर्बंध लागू केले आहेत यामध्ये सर्व आस्थापना , शासकीय कार्यालये, खाजगी कार्यालये यांना 50% कर्मचारी संख्येमध्ये काम करणाऱ्या बाबत सूचना केल्या आहेत , गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतर, मास्कचा वापर इत्यादी गोष्टी तसेच राज्यातील सिनेमागृह , मॉल, रेस्टॉरंट यांना 50% क्षमतेने चालवण्याची मुभा देण्यात आली आहे तर सर्व शाळा महाविद्यालये 15 फेब्रुवारी पर्यंत बंद करण्यात आले आहेत, मंगल कार्यालय यांना केवळ 50 लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्नासाठी परवानगी देण्यात आली आहे मात्र राज्यातील सर्व गडकिल्ले, पर्यटन स्थळ, मनोरंजन पार्क, वॉटर पार्क , स्विमिंगपुल हे पूर्णतः बंद करण्यात आले आहेत त्यामुळे राज्यातील व्यावसायिक सरकारच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजगी व्यक्त करत आहेत,लातूर जिल्ह्यत चाकूर तालुक्यातील सुप्रसिद्ध साईनंदनवनम् हे एक धार्मिक तसेच पर्यटन स्थळ आहे जिथे मनोरंजन पार्क , वॉटर पार्क सुद्धा आहे या पार्क चे संचालक विशाल जाधव यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना तीव्र शब्दात सरकार जो दुजाभावाबाबत नाराजी व्यक्त केली.

या व्यवसायाबातत गेली दीड वर्षीपासून या उद्योगाव करत आहे त्या वर नाराजगी व्यक्त केली त्याच्या मते गत दोनवर्ष पूर्वी 15 मार्च 2020 रोजी केंद्र व राज्य सरकार यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेत देशातील व राज्यातील सर्व पर्यटन स्थळे, मनोरंजन पार्क , वॉटर पार्क , स्विमिंग पूल तब्बल 11 महिने बंद केले होते त्यानंतर परत दुसऱ्या लाटेतही 4 महिने बंद केले या वर्षी परत आता संपूर्णतः बंद करण्यात आले आहेत एकीकडे बंदिस्त जागेत सिनेमागृह, शॉपिंग मॉल, उपहारगृह, रेस्टॉरंट यांना 50% क्षमतेने व्यावसाय करण्यास परवानगी दिली आहे तसेच जिथे कोरोना जास्त आहे त्या मुंबई मध्ये लोकल ट्रेन 100% क्षमतेने चालू ठेवले आहे बाकी सर्व व्यवसाय थोडे फार निर्बंध लावून चालू आहेत मग असे असताना केवळ पर्यटन व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याचे काय तर्क सरकार ने लावले आहेत हा खोचक सवाल विशाल जाधव यांनी सरकार ला विचारला आहे , पर्यटन स्थळ , किल्ले , मनोरंजन पार्क , वॉटर पार्क , स्विमिंग पूल, उद्याने हे सर्व खुल्या जागेत मोकळ्या हवेत असतात मग बंदिस्त जागेत कोरोना पसरत नाही आणि खुल्या हवेशीर जागेत कोरोना पसरतो हे कुठलं संशोधन सरकार ने लावले आहे हे समजण्या पलीकडे आहे असे विशाल जाधव म्हणाले, देशाच्या GDP मध्ये पर्यंटन क्षेत्राचे 8% योगदान असताना हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे तरी या कडे सरकारने सपेशल दुर्लक्ष केले आहे.

या क्षेत्राला गेली दीड वर्ष झाले गृहीत धरले जात आहे या पर्यटन व्यवसायावर जवळ जवळ दीड कोटी लोक प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे अवलंबून आहेत याचा विचार सरकार करत नाही आहे सरकार ने या व्यावसायला या कोरोनाच्या अर्थीक संकटातून बाहेर काढण्याचे कुठलेही प्रयत्न केले नाहीत, उलट सर्व टॅक्सेस, GST, वीजबिल, प्रॉपर्टी टॅक्स अगदी चोख वसूल केले आहे जे व्यवसाय देशाच्या राज्याच्या आर्थिक विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावते , विविध टॅक्सेस च्या माध्यमातून सरकार ला महसूल जमा करून देते त्याची अवस्था आज कोलमडून पडल्या सारखी झाली आहे , या व्यवसायावर अवलंबून असणारे मजूर, गाईड, कर्मचारी व्यवसायिक हे प्रचंड आर्थिक नुकसानीत आणि तणावात आहेत, एकीकडे राज्यात नवनवीन पर्यटन धोरण सरकार राबवत आहे तर दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या या व्यवसायाला मात्र कोणी लक्ष देत नाही आहे अश्या पद्धतीने या पर्यटन स्थळांकडे सरकारचे दुर्लक्ष चालुच राहिले तर भविष्यात राज्यात पुन्हा कितीही पर्यटन धोरणे राबवली तर झालेली हानी भरून निघणार नाही पर्यायाने हे व्यवसाय बुडून जातील, जिल्ह्यात वृंदावन पार्क आणि लातूर मध्ये महानगर पालिका हद्दीत वंडर वर्ल्ड असे दोनच मनोरंजन पार्क आहेत शिवाय उदगीर ,औसा इतिहास कालीन येथे किल्ले आहेत तर खरोश्याच्या पुरातन लेणी देखील आहेत अश्याप्रकारे राज्यतील पर्यटन व मनोरंजन पार्क बंद करून यांच्या वर उपजीविका करणारे , छोटे व्यावसायिक यांचे सरकारने पूर्णपणे आर्थिक, नुकसान केले आहे त्यामुळे यापुढे हे बंद राहिले तर पूर्णतः कायम स्वरूपी बंद पडणार आहेत त्यामुळे राज्याचे पालक म्हणून मा.मुख्यमंत्री , मा. पर्यटन मंत्री , मा. पालकमंत्री, मा.जिल्हाधिकारी यांनी हे उद्योग इतर उद्योगा प्रमाणे किमान 50% उपस्थितीत चालू करण्याचा निर्णय त्वरित घ्यावा अशी अपेक्षा विशाल जाधव यांनी आमच्याशी बोलताना व्यक्त केली आहे.

विशाल जाधव











