राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र लातूरला मंजूर
वेळापत्रक जाहीर; नाट्यकलावंत, रसिकांसाठी पर्वणी
लातूर : प्रतिनिधी
महारष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे केंद्र लातूरला मंजूर झाले आहे़ राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी हे केंद्र मंजूर केल्याने लातूरच्या सांस्कृतिक क्षेत्रात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे़ राज्य नाट्य स्पर्धेचे लातूर केंद्राचे वेळापत्रक जाहीर झाले असुन दि़ २१ ते २६ फेब्रुवारी दरम्यान येथील मार्केट यार्डातील स्व़. दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृहात दररोज सायंकाळी ७ वाजता विविध नाटकांचे सादरीकरण होणार आहे़. त्यामुळे नाट्य रसिकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे़. महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे लातूरला केंद्र व्हावे, ही लातूर जिल्ह्यातील नाट्य कलावंत आणि नाट्य रसिकांची प्रदीर्घ मागणी होती़.

ही मागणी विचारात घेऊन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र लातूरला मंजूर केले आहे़. त्यामुळे दि़ २१ ते २६ फेब्रुवारी दरम्यान लातूरच्या केंद्रावर ६० वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी रंगणार आहे़. खरे तर राज्य नाट्य स्पर्धेत अनेक दशके लातूरच्या कलावंतांनी आपले सांस्कृतिक वर्चस्व सिद्ध केलेले आहे़. प्रत्येक स्पर्धेत भरघोस पारितोषीके पटकावूनही लातूरच्या कलावंतांना सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड अशा केंद्रांवर जाऊन आपली कलाकृती सादर करावी लागत होती़. शिवाय लातूरच्या प्रेक्षकांनाही अशा स्पर्धेत सादर होणाºया नाट्य कलाकृतीपासून वंचित राहावे लागत असत़ आता लातूरला राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र मंजूर झाल्याने नाट्य रसिकांनाही सादर होणारी नाटकं पाहता येतील़.
राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत लातूरच्या केंद्रावर सादर होणारी नाटकं पुढील प्रमाणे आहेत़ दि़ २१ फेब्रुवारी रोजी बाळकृष्ण धायगुडे लिखीत व प्रदीप भोकरे दिग्दर्शित तोच़़ पण गोष्ट निराळी , दि़ २२ फेब्रुवारी रोजी अभय राठोड लिखीत व दिग्दर्शित राजा हरिश्चंद्र, दि़ २४
फेब्रुवारी रोजी विभाकर मिरजकर लिखीत व अनिल कांबळे दिग्दर्शित व्यक्त अव्यक्त, दि़ २५ फेब्रुवारी रोजी शिल्पा नवलकर लिखीत व संपदा कुलकर्णी दिग्दर्शित सेल्फी तर दि़ २६ फेब्रुवारी रोजी पांडूरंग वाघमारे लिखीत व कल्याण वाघमारे दिग्दर्शित तु याव ही नाटकं दररोज सायंकाळी ७ वाजता सादर होणार आहेत़. या नाटकांचा जास्तीत जास्त नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चौरे यांनी केले आहे़.
सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव





