*अल्फ़ाज़ो की उड़ान* प्रातिनिधिक
कथासंग्रहाचे प्रकाशन!
नागेश शेवाळकर यांच्या दोन कथांचा समावेश!!
पुणे:- महाराष्ट्रातील ख्यातकीर्त लेखक नागेश सू. शेवाळकर यांच्या दोन हिंदी कथांचा समावेश असणारा ‘अल्फ़ाज़ो की उड़ान’ हा कथासंग्रह २६ जुलै २०२१ रोजी उज्जैन (मध्यप्रदेश) येथे प्रकाशित होत आहे. जतिन गहलोत प्रकाशक यांनी श्रीहिन्द पब्लिकेशनव्दारे हा प्रातिनिधिक हिंदी कथासंग्रह प्रकाशनार्थ सज्ज केला आहे.
महाराष्ट्रातील नामवंत लेखक नागेश सू. शेवाळकर यांनी लिहिलेल्या ‘चाय पुराण’ आणि ‘डर कोरोना का’ या दोन हिंदी विनोदी कथांचा ह्या कथासंग्रहात समावेश करण्यात आला आहे. मराठी भाषेत लेखन करणाऱ्या शेवाळकरांनी हिंदी भाषेत लेखनाचा असा शुभारंभ केला असून या यशाबद्दल नागेश शेवाळकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. हा कथासंग्रह, अमेझॉन, किंडले अशा संस्थांवर विक्रीसाठी उपलब्ध असेल असे जतिन गहलोत यांनी कळवले आहे.











