निधी कमी पडू दिला जाणार नाही..- आ. संभाजीराव पाटील निलंगेकर.
निलंगा,-(प्रशांत साळुंके)-
निलंगातालुक्यातील बोरसुरी परिसरात गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद च्या माध्यमातून ६५८ लक्ष रुपये निधी खर्च करून ३.६८१द.ल.क्ष.मि. पाणीसाठा उपलब्ध होऊन ४२९ हेक्टर जमीन ओलिताखाली येईल व पिण्यासाठी पाण्याची सोय होईल अशा स्वरूपाचे बोरसुरी साठवन तलावाच्या कामाची क्षत्रिय पाहणी करण्यासाठी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी प्रत्यक्ष साठवण तलाव ठिकाणी जाऊन कामाची पाहणी केली. त्यावेळी लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र काळे , उप विभागीय अभियंता नर्सिंग कुलकर्णी ,तहसीलदार गणेश जाधव ,जिल्हा परिषद कृषी सभापती गोविंदराव चिलकुरे, दगडू साळुंखे ,शेषराव ममाळे, संपत पाटील ,व्यंकटराव पाटे ,शिवाजी पवार, बोरसुरी चे सरपंच माणिक प्रभू खरगे ,उपसरपंच व्यंकटराव चामे , संबंधित विभागाचे कर्मचारी,आदी प्रमुख उपस्थित होते.

बोरसुरी परिसरात सिंचनाची सोय असल्यामुळे बारमाही पिके ,बागायत शेती करता येत नव्हते त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची फार मोठी टंचाई उन्हाळ्यामध्ये जाणवत होती त्यामुळे बोरसुरी भागातील जनतेने अनेक वर्षांपासून या भागातील पिण्याच्या पाण्याचा व शेतीसाठी सिंचनाचा प्रश्न सुटावा यासाठी बोरसुरी शिवारामध्ये साठवण तलाव उभारण्यात यावे अशी मागणी शासनाकडे व लोकप्रतिनिधींकडे वेळोवेळी केली होती.
त्या भागातील जनतेची पाण्याविना होणारी शेती व पिण्याच्या पाण्याची अडचण लक्षात घेऊन आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या प्रयत्नाने या साठवण तलावासाठी विशेष निधी प्राप्त करून दिला व ते काम आज प्रगतीपथावर आहे त्या कामाची क्षत्रिय पाहणी करण्यात आली. त्यावेळी त्या भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते संबंधित सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून मोबदला िळाल्याचे अधिकार्याने सांगितले ज्या शेतकऱ्यांना अद्याप फूड मोबदला मिळाला नाही त्याला तात्काळ देण्यात यावे अशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केली.

साठवण तलावाचे काम पूर्णत्वास येत असून राहिलेल्या कामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून दिल्यास लवकरात लवकर साठवण तलावात पाणी साठवण येईलअसे सांगून आमदार साहेबानी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे कार्यकारी अभियंता काळेसाहेब म्हणाले. जून महिन्या पर्यंत काम पूर्ण करून यावर्षी पाणी तलावामध्ये साठवण्यात यावे आणि जनतेला त्याचा लाभ घेता यावा अशा पद्धतीने संबंधित अधिकाऱ्याने काम करावे कामासाठी लागणारा निधी साठी पाठपुरावा करून निधी मिळवून दिला जाईल निधी कमी पडू दिला जाणार नाही असे यावेळी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सांगितले.

साठवण तलावाच्या संपूर्ण कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले हजार शेतकऱ्यांना मावेजा नियमानुसार मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना चौकशी करून जमिनीचा मावेजा पूर्णपणे मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा अशा सूचनाही आमदार साहेबांनी केले.




