विश्वेश्वर संकुलात जागतिक महिला दिन निमित्त विश्व वर्धिनी पुरस्कार 2022 वितरण सोहळा संपन्न
भारतीय संस्कृती ही शैक्षणिक क्षेत्रातच पहावयास मिळते-मधुरा बाचल
औसा- (प्रतिनिधी)
संयुक्त राष्ट्र संघाने 1975 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यास सुरुवात केली असून ज्याला आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणुन घोषित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिलांच्या सांस्कृतिक, राजकीय, सामाजीक व आर्थिक कामगिरीच्या सन्मानार्थ साजरा करण्यात येणारा जागतिक दिवस असून हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो. या पाश्र्वभूमीवर 2022 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने लैंगिक समानता ही संकल्पना ठेवून 8 मार्च, 2022 हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणुन साजरा करण्याचे ठरविले आहे
. भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीस 2022 मध्ये 75 वर्षे पुर्ण होत असल्याने भारतीय संस्कृतीचा, कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास साजरा करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने आजादी का अमृत महोत्सव हा उपक्रम देशभरात विविध पध्दतीने साजरा करण्याचे ठरविले आहे.

याच अनुषंगाने श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, आलमला ता. औसा जि. लातूर या संस्थे अंतर्गत शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, दगडोजीराव देशमुख डी. फार्मसी कॉलेज, विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालय, ब्ल्यू बर्ड इंटरनॅशनल स्कुल, ब्ल्यू बर्ड ज्युनीअर सायन्स कॉलेज व विश्वेश्वरय्या औद्यौगीक प्रशिक्षण संस्था मध्ये जागतिक महिला दिन मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिध्द मधुरा रेसिपीच्या संचालिका सौ. मधुरा बाचल यांच्या शुभहस्ते व संस्थेचे अध्यक्ष शिवचरण धाराशिवे, सचिव बसवराज धाराशिवे, सहसचिव महादेव खिचडे, संचालक, विश्वनाथ निलंगेकर, प्रभाकर लोहारे, अॅड. महिशंकर धाराशिवे, शिवकांता धाराशिवे, संचालिका अलकनंदा धाराशिवे, पल्लवी शिंदे, दिपमाला धाराशिवे, कल्पना माळवदे, मेघा धाराशिवे, ज्योती सुर्यवंशी, अनुराधा धाराशिवे, शालिनी खिचडे, शुभांगी धाराशिवे, रेखाताई नागराळे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात संस्थेचे सचिव बसवराज धाराशिवे यांनी जागतिक महिला दिन निमित्त सामाजीक, शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतीक व क्रिडा क्षेत्रात नावलौकि करणाया कृर्तत्वान महिलांचा सन्मान संस्थेच्या वतीने करावा ही संकल्पना डोळयासमोर ठेवुन या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले व उपस्थित विद्यार्थीनी, महिला कर्मचारी आणि माता पालकांना संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच वैद्यकीय, सामाजीक, शैक्षणिक, सांस्कृतीक व कला, क्रिडा अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरी करणाया कृर्तत्वान महिलांचा सन्मान संस्थेच्या वतीने सुप्रसिध्द रेसिपी सौ. मधुरा बाचल यांच्या शुभहस्ते सौ. शरयू सागर कारंजे,उद्यौजीका,औसा, डॉ. सगीरा जावेद पठाण, मॅक्सकेअर हॉस्पीटल,लातूर, कु. सृष्टी सुधीर जगताप, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड,लातूर, सौ. प्रिया सुशांत शिंदे,बाल समुपदेशक,मंुबई, सौ. अनिता जे. मामडगे, सामाजीक कार्यकत्र्या, आर्ट ऑफ लिव्हींग, लातूर यांना विश्व वर्धिनी पुरस्कार 2022 देऊन गौरविण्यात आले.
संस्थेच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधुन विद्यार्थीनी व महिला कर्मचारी यांच्याकरीता कुकींग, केक बेकिंग व सलाड डेकोरेशन अशा विविध स्पर्धेमधील व विद्यार्थी माता पालकांसाठी ठेवण्यात आलेल्या लकी ड्रॉ मधील विजेत्यांना आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मधुरा बाचल यांची प्रा. सुरज मालपानी यांनी प्रकट मुलाखत घेतली. मुलाखत देताना मराठमोळया खाद्य पदार्थांना जागतिक स्तरावर डिजीटल प्लॅटफॉर्म मिळावा यातून मधुरा रेसिपीचा जन्म झाल्याचे सांगितले आणि याचा प्रवास करताना अनेक चढ उतार अनुभवास आले. महिलंाना उद्देशून जे काम तुम्ही करता त्याचे अगोदर नियोजन करा त्याची पडताळणी करा आणि बेस्ट देण्याचा प्रयत्न करा कारण चांगले काम करताना अडचणी येतच असतात. तसेच श्री विश्वेश्वर संकुलात आल्यानंतर भारतीय संस्कृतीचे दर्शन अनुभवयाला मिळाले कारण भारतीय संस्कृती ही शैक्षणिक क्षेत्रातच पहावयास मिळते.
याप्रसंगी प्रिया शिंदे, बाल समुपदेशक, मंुबई यांनी आपल्या मनोगतात माता पालकांसाठी स्त्री ही वेगवेगळया भूमिकेतून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत असते. पालकत्वा संदर्भात बोलताना पालक हेच आपल्या मुलांच्या जीवनाचे शिल्पकार असल्याचे सांगून पालकांनीही आपल्या मुलांची तूलना इतर मुलाबरोबर करु नये असे सांगितले.
कार्यक्रमा दरम्यान महिलांकरीता कोव्हिड 19 लसीकरण मोहिम राबविण्यात आली. लसीकरणास प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, आलमला येथील प्रमिला शिंदे, डॉ.संतोष पाटील, बंडे जी.जी. यांचे सहकार्य लाभले.
महिलांसाठी खास पर्वणी म्हणुन मधुरा रेसिपीच्या मधुरा बाचल यांच्या मराठमोळया पाक कलेची माहिती उपस्थित विद्यार्थीनी व माता पालकांना प्राप्त झाल्याने संस्थेबाबत कृर्तघ्नता व्यक्त केली. तसेच गीता दंडे व शिवम् चिंचोलकर यांनी संस्थेचे अध्यक्ष व मधुरा बाचल यांचे रेखाटलेले रेखाचित्र भेट म्हणुन दिले व विश्वेश्वरय्या पॉलिटेक्नीकच्या कॅमप्स मुलाखतीत निवड झालेल्या विद्याथ्र्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. विद्या कापसे (येलम), प्राचार्या फिरदोस देशमुख, स्वाती कापसे, प्रतिभा थावरे, रेशमा पाडुळे, राजेश्वरी इंडे, अंजली येरटे, कल्पना देशमुख, कविता सिरगिरे, योगीता माळी, प्रिया पल्लोड, अंजगी गव्हाणे, रजनी वर्मा, हालिमा अरब, पुजा मंत्री, रेश्मी दुधनकर, शीतल पटणे,श्रध्दा सुरवसे, कोमल हालकुडे, रेणुका जोशी, अमृता कोयले, सुर्वणा वागदरे, सुलभा देशमुख, दिपा पोतदार, सुप्रिया जाधव, मयुरी सुर्यवंशी, मयुरी चव्हाण, काजल घोडके, शारदा पुणे इत्यांदीनी अथक परीश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. मयुरी चंद्रवंशी, सचिन हंगरगेकर यांनी केले तर आभार विद्या कापसे (येलम) यांनी केले.
–