पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तत्परतेने सोडवण्याची अधिवेशनात मागणी
लातूर :
“लातूरमधील पाणी टंचाईचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे आता पाणी कुठूनही आणा; पण लातूरच्या पाण्याचा प्रश्न यापुढे अधिक तत्परतेने सोडवा”, अशी मागणी ‘लातूर ग्रामीण’चे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी सोमवारी (ता. 14) अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. राज्य सरकार हा प्रश्न नक्की सोडवेल अशी आम्हाला आशा आहे, असेही ते म्हणाले.
लातूरमधील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे आमदार श्री. धिरज देशमुख यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य सरकारचे लक्ष वेधले. ‘महाराष्ट्र दुष्काळमुक्त करू’, ही राज्य सरकारची भूमिका आहे. त्यामुळे राज्य सरकारने लातूरच्या पिण्याच्या पाण्याचा विषय जलद गतीने सोडवावा. कारण पाण्याचा समान वापर, हा आपल्या सर्वांचा अधिकार आहे, असे आमदार श्री. धिरज देशमुख यांनी सांगितले.




