आर्य वैश्य महासभा

0
409

महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी सुमित रुद्रवार

केज / प्रतिनिधी

महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेची नुतन जिल्हा कार्यकारीणी नुकतीच जाहिर करण्यात आली आहे. सभेचे ज्येष्ठ मार्गदर्शक यांच्या प्रमुख उपस्थितीत नूतन कार्यकारणीचे पदाधिकाऱ्यांनानिवडीचे पत्र देण्यात आले.बीड येथे महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांच्या मार्गदर्शनानुसार आणिसमन्वयक विकासराव डुबे व अभयसेठ कोकड, माणिकराव शेटे, नागनाथजी पारसेवार यांच्या प्रमुखउपस्थितीत नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली.यावेळी माजलगाव येथील युवा नेतृत्व सुमित रूद्रवार यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.या कार्यकारणीत जिल्हा कार्याध्यक्षपदी सूर्यकांत महाजन (बीड),जिल्हा सचिवपदी वैभव झरकर (परळी वैजनाथ), कोषाध्यक्षपदी अभय भावठाणकर (धारूर), सहसचिवपदी सचिन पिलाजी (केज), सहकोषाध्यक्षपदी राम हराळे (अंबाजोगाई), सल्लागार म्हणून रविकिरण गडम तर हिशोबतपासणीस म्हणून सीए समीर (सुचित) शेटे यांचा समावेश आहे.

सदरीलकार्यकारणी सदस्यांची निवड बीड जिल्ह्यातील उपस्थित सर्व समाज बांधवांच्या सहमतीने व महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांच्या सूचनेवरून आणि समन्वयक विकासरावडुबे,अभयसेठकोकड,संस्थापकअध्यक्ष गजानन डुबे,संजय डुबे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.निवडीची बैठक बीड येथे झाली.बैठकीस मोठ्या संख्येने आर्य वैश्य (कोमटी) समाज बांधव उपस्थित होते.

यावेळी उपस्थितमान्यवरांनी नुतन कार्यकारणीस  शुभेच्छा देवून समाज बांधवांनी सामाजिकसलोखा राखून कार्य करावे असे आवाहन केले.या प्रसंगी आर्यवैश्य (कोमटी) समाजाच्या वतीने नुतनपदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित अध्यक्ष सुमित रूद्रवारम्हणाले की,यापूर्वीचे अध्यक्ष आणि सर्वच कार्यकारणीने मागील तीन वर्षांत अतिशय उत्तम काम केले.त्याच पध्दतीने आमच्याकडून सर्वांना सोबत घेऊन काम करण्यात येईल.समाजाचे जास्तीत जास्त संघटनकरण्याचा, विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करू असे अध्यक्ष सुमित रूद्रवार म्हणाले.याप्रसंगी समाजातील ज्येष्ठ विकासराव डुबे आणि अभयसेठ कोकड यांनी उपस्थित पदाधिकारीयांना मौलिक मार्गदर्शन केले.यावेळी बीड जिल्ह्यातील बीड,परळी, धारूर,माजलगाव, अंबाजोगाई, केजयेथील आर्यवैश्य (कोमटी) समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सूर्यकांतमहाजन यांनी केले.तर उपस्थितांचे आभार संजीव डुबे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here