आदरांजली

0
245

अनंत मनोहर गेले..

अरण्यकांड वाचलं त्याला दोन दशकं उलटून गेली . इतके जिवंत , खिळवून ठेवणारे , भन्नाट काहीतरी नेहमी वाचनात येत नाही . कर्नाटकातलं बरचसं अस्पर्श राहिलेलं कारवार , शिमोग्याजवळचं घनदाट जंगल , तिथलं सुक्ष्म किटकांपासून असंख्य परस्परावलंबी जीवांचं स्वतंत्र जग , त्याचाच एक भाग असलेले आदिवासी सोडले तर माणसांचं अस्तित्व फक्त विविध जीव , लाकडं , औषधी वनस्पती यांचे तस्कर आणि वन विभाग यापुरतंच . ज्याचं अस्तित्वभय पसरून आहे जंगलभर असा सैतान हा किंग कोब्रा. शेवटी त्याची मादी अंडी घालण्यासाठी जागा शोधत असते तेव्हा सैतानाचा देह मुंग्यांनी वेढलेला आहे ..

आज आठवते ते इतकंच . 

ज्येष्ठ , राब सारख्या कादंबऱ्या आणि अनेक कथा ( आत्ता एक आठवतेय त्यातली एक – नाव नाही आठवत – शाळेत ती सगळ्यात हुशार , सातवी आठवीत तो येतो . तोही हुशार पण अन्यही बाबीत रस , विशेषतः खेळात , नेतृत्त्वात . तिला वाटते , थोडे आवळले बाकी उद्योग तर कुठल्या कुठे जाईल .. दहावीत ती बोर्डात येते आणि तो चांगल्या मार्गांनी पास होतो , वाटा वेगळ्या होतात. ती विद्यापीठातली नामवंत प्राध्यापिका , विषयातली अधिकारी . तो राजकारणात चढत मंत्री . एकदा तिच्या कॉलेजात प्रमुख पाहुणा . तसं काही नसुनही दोघांच्याही मनात आहेत एकमेक .. आयुष्यात यश कशात मोजावं यावर थेट न बोलताही फार चांगलं भाष्य आहे कथेत . ) आपापली जागा राखून आहेतच , पण अरण्यकांडसाठी तरी तुम्ही लक्षात राहाल सर…!

अनंत मनोहर यांना आदरांजली.. 🙏🙏🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here