लातूर
लक्ष्मी अर्बन को-ऑप बँक लि, लातूर या बँकेने नुकतेच आपल्या सेवेची २५ अर्थिक वर्ष पूर्ण केले आहेत. बँकेने रोप्य महोत्सवी वर्षात मार्च 2022 अखेर बँकेने यशस्वी वाटचाल केली आहे.
वर्षा अखेर बँकेचे भाग भांडवल ५५५ लक्ष, ठेवी १३५.५८ कोटी, कर्ज वाटप ८५.५५ कोटी, एकुण व्यवसाय २२१.१३ कोटी इतका झाला आहे. नेट एन. पी. ए. हा ०.९१% ईतका कमी राखण्यात बँकेस यश आले असुन बँकेस निव्वळ नफा १२९ लक्ष ईतका झाला आहे.
बँकेने कोरोना काळात ग्राहकांना अविरतपणे सेवा दिली आहे, बँकेचे सभासद, ग्राहक, कर्जदार व हितचिंतकांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल बँकेच्या संचालक मंडळाने ऋण व्यक्त केले आहे. बँकेचे संचालक व कर्मचारी यांनी भारतीय रिझर्व बँकच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले आहे.
बँकेने मागील वर्षाच्या तुलनेत ठेवी व कर्जाचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न केले. थकीत कर्जाचे प्रमाण कमी झाले असून फक्त कायदेशीर कारवाई सुरू असलेली काही खाती थकित आहेत. चालू अर्थिक वर्षात शून्य एन. पी.ए. करण्याचा बँकेचा संकल्प आहे.
बँकेने ग्राहकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना, अटल पेंशन योजना, FASTag, BBPS अशा सेवा देऊन सातत्याने प्रगतीचा आलेख गाठण्यात यश मिळवले आहे.सामाजिक क्षेत्रात देखील बँकेने भरीव योगदान दिले आहे. चालु वर्षात बँकेकडून ATM, UPI, IMPS,QR कोड या सुविधा सुरू होत आहेत, बँक लवकरच सर्व अधुनिक बँकिंग सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून देत आहे.
बँकेचे अध्यक्ष श्री अशोक अग्रवाल, उपाध्यक्ष श्री सुर्यप्रकाश धुत, संचालक मंडळ, बँकेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अविनाश आळंदकर व कर्मचारी यांनी सर्व सभासद, खातेदार, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतकांचे ऋण व्यक्त करून बँकेच्या सर्व सुविधांचा लाभ घेऊन बँकेच्या विकासासाठी आपले योगदान व सहकार्य कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे.