25.6 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeआंतरराष्ट्रीयवाईन,व्हिस्की वाईट...

वाईन,व्हिस्की वाईट…

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने लंडन येथील

आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत पेयांवरील संशोधन सादर !

नारळ पाणी, संत्र्याचा रस, देशी गायीचे दूध व्यक्तीमध्ये सकारात्मकता

वाढवते, तर ‘वाईन’, ‘व्हिस्की’, ‘बियर’ नकारात्मकता वाढवते !

   ‘खाद्यपदार्थ आणि पेये त्यांच्या गुणधर्मानुसार सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करतात. त्यानुसार त्यांचे सेवन केल्याचा आपल्या आध्यात्मिक स्थितीवर आणि प्रभावळीवर परिणाम होतो. नारळाचे पाणी, संत्र्याचा रस किंवा देशी गायीचे दूध यांसारख्या सात्त्विक पेयांचे सेवन केल्याने व्यक्तीला या पेयांच्या माध्यमातून सकारात्मकता मिळते आणि त्याचा व्यक्तीला अन् त्याच्या भोवतालच्या समाजालाही शारीरिक आणि आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो; तर ‘वाईन’, ‘व्हिस्की’, ‘बियर’, तसेच ‘ब्रँडेड’ (प्रथितयश आस्थापनांची उत्पादने) बाटलीबंद पाणी व्यक्तीमधील सकारात्मक ऊर्जा नष्ट करून नकारात्मक ऊर्जा वाढवते, असे संशोधनामध्ये दिसून आले असल्याचे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे श्री. शॉन क्लार्क यांनी ‘फूड अ‍ॅन्ड बॅवरेजस’च्या 31 व्या जागतिक परिषदेत बोलतांना केले. लंडन, यू.के. येथील ‘कॉन्फरन्स सीरीज एल्.एल्.सी. लिमिटेड कॉन्फरन्सीस’ (Conference Series LLC LTD Conferences) यांनी या परिषदेचे आयोजन केले होते.

    श्री. क्लार्क यांनी ‘मद्यपानाचा व्यक्तीवर आध्यात्मिक स्तरावर होणारा परिणाम’ हा शोधनिबंध सादर केला. या शोधनिबंधाचे लेखक महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले असून श्री. शॉन क्लार्क सहलेखक आहेत. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीन वैज्ञानिक परिषदांमधील हे 88 वे सादरीकरण होते.

    श्री. क्लार्क यांनी त्यांच्या सादरीकरणात पेयांच्या संदर्भात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेले संशोधन विस्ताराने मांडले. विश्‍वविद्यालयाने केलेल्या एका प्रयोगात 8 पेये आणि त्यांचा व्यक्तींच्या प्रभावळीवर होणारा सूक्ष्म परिणाम ‘यूनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या ऊर्जा मापक उपकरणाद्वारे अभ्यासण्यात आला. यातून असे लक्षात आले की, प्रयोगात वापरलेल्या सर्वच मद्यांमध्ये 11.5 टक्के ‘अल्कोहोल’ असूनही ‘रेड वाईन’ची प्रभावळ सर्वाधिक नकारात्मक होती, त्यानंतर अनुक्रमे ‘व्हिस्की’ आणि ‘बियर’ची होती. प्रथितयश आस्थापनांच्या बाटलीबंद पाण्यातही नकारात्मक स्पंदने होती. नारळाचे पाणी, संत्र्याचा ताजा रस, भारतीय गायीचे दूध आणि गोव्यातील आध्यात्मिक संशोधन केंद्रातील पाणी यांमध्ये नकारात्मक प्रभावळ मुळीच नव्हती, तर केवळ सकारात्मक प्रभावळ होती.

    अन्य एका प्रयोगात, एक पुरुष आणि एक महिला यांना प्रतिदिन वेगवेगळे पेय असे 8 वेगवेगळ्या दिवशी 8 वेगवेगळी पेये सेवन करण्यास सांगण्यात आले. ‘यूनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाने त्या दोघांनी प्रतिदिन पेय सेवन करण्यापूर्वी आणि पेय सेवन केल्यानंतर 5 मिनिटे आणि 30 मिनिटे झाल्यानंतर केलेल्या निरीक्षणांतून लक्षात आलेे की, दोघांच्या सकारात्मक प्रभावळींवर भारतीय गायीच्या दुधाचा सर्वात चांगला परिणाम झाला, ती 500 ते 600 टक्के वाढून दोघांची नकारात्मक प्रभावळ 91 टक्क्यांपर्यंत घटली. संत्र्याच्या रसानेही सकारात्मक प्रभावळ 358 टक्क्यांनी वाढली आणि नकारात्मक प्रभावळ 85 टक्क्यांनी घटली. ‘व्हिस्की’, ‘बियर’ आणि ‘वाईन’ या नकारात्मक परिणाम करणार्‍या पेयांनी 5 मिनिटातच दोन्ही व्यक्तींमधील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ पूर्णतः नष्ट केली. ‘बियर’मध्ये सर्वाधिक नकारात्मकता आढळली. तिचे सेवन केल्यानंतर एका व्यक्तीमधील नकारात्मकता जवळ जवळ 5000 टक्क्यांपर्यंत वाढली. त्या खालोखाल नकारात्मक परिणाम ‘रेड वाईन’चा आढळला. प्रयोगात तिचे सेवन करणार्‍या महिलेची नकारात्मक प्रभावळ अर्ध्या घंट्यातच 3691 टक्के आणि पुरुषाची 1396 टक्के वाढली. ‘कोला’ पेयाचाही दोघांवर नकारात्मक परिणाम झाला.

   ‘जी.डी.व्ही. बायोवेल’ हे उपकरण वापरून केलेल्या अभ्यासात ‘वाईन’ सेवन केल्यानंतर व्यक्तीची कुंडलिनी चक्रे मध्य रेषेपासून पुष्कळ दूर झाली आणि त्यांची ऊर्जा न्यून झाली, असे आढळले. हे प्रतिकूल परिणामाचे दर्शक आहे.

     त्याचप्रमाणे, पार्टीमध्ये सेवन करण्यात आलेल्या पेयांचा सूक्ष्म ऊर्जेच्या स्तरावरील परिणाम अभ्यासण्यासाठी संगीत, पाश्‍चिमात्य नृत्य आणि शाकाहारी खाद्यपदार्थ ठेवण्यात असलेली एक पार्टी आयोजित करण्यात आली. सहभागी झालेल्या दहा जणांपैकी काहींना एकसारखेेच ‘अल्कोहोल’चे प्रमाण असलेली पेयेे आणि काहींना ‘अल्कोहोल’ नसलेली पेये देण्यात आली. ती 2 घंट्यांंमध्ये सेवन करायची होती. प्रभावळींच्या निरीक्षणांनी आढळले की, पार्टीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या प्रभावळीतील सकारात्मकता पूर्णपणे नाहीशी झाली होती. ‘अल्कोहोल’ नसलेल्या पेयांमधील सकारात्मकता तेथील संगीतामुळे आणि वातावरणामुळे नष्ट झाली होती आणि त्यामुळे ती सेवन केलेल्या व्यक्तींमध्ये नकारात्मक प्रभावळ निर्माण झाली.

रुपेश लक्ष्मण रेडकर,

संशोधन विभाग, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय,

(संपर्क : 95615 74972)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]