लातूर प्रतिनिधी-
पुणे येथील हॉटेल ऑर्थिड येथे पार पडलेल्या विवाहित डॉक्टर महिलांसाठी आयेजित करण्यात आलेल्या आशिया खंडातील पहिल्या मेडिको पेजंट मध्ये लातूरच्या डॉ. वर्षा महिंद्रकर या मिसेस पॅशिनेट ठरल्या, या स्पर्धेत महाराष्ट्रातुन 200 पेक्षा अधिक महिला डॉक्टरांनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी ५३ महिलास्पर्धक अंतिम फेरीत पात्र ठरल्या त्यात लातुरच्या डॉ वर्षा महिंद्रकर होत्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. प्रेरणा बेरी सेक्रेटरी, डॉ. प्राजक्ता शहा व कोरीओग्राफर म्हणुन योगेश पवार यांनी यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली.
या प्रसंगी प्रसिध्द अभिनेते समीर धर्माधिकारी, सुशांत शेलार, तेजपाल वाघ, गायक उत्कर्ष शिंदे, अभिनेत्री पुजा सावंत हे प्रमुख पाहुने म्हणुन उपस्थित होते.
डॉ. वर्षा महिंद्रकर यांनी या स्पर्धेत यश संपादन करून डॉक्टर म्हणजे फक्त अभ्यासु व्यक्ती नसुन ती सर्वगुणसंपन्न असु शकते हे दाखवून दिले.
डॉ. वर्षा महिंद्रकर यांनी त्यांच्या यशाचे संपुर्ण श्रेय हे त्यांचे पति डॉ. सुनिल महिंद्रकर यांना दिले आहे. पतीची सहमती, प्रोत्साहन मुलांची साथ व परिवारातील सर्व सदस्यांचे शुभाशिर्वाद या सर्व गोष्टींमुळेच हे यश गाठु शकले असे त्या म्हणाल्या .
जर एखाद्या स्त्रीला घरातून पुर्ण पाठिंबा असेल तर ती कोणतीही अशक्य गोष्ट ही शक्य करुन दाखवू शकते हे त्यांनी दाखवुन दिले. त्यांच्या या यशाबददल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
—————————————————————-




