38.4 C
Pune
Tuesday, March 24, 2026
Homeठळक बातम्याज्येष्ठ नागरिक संघाचा रविवारी द्वीदशक वर्धापन दिन

ज्येष्ठ नागरिक संघाचा रविवारी द्वीदशक वर्धापन दिन

लातूर ; दि.३०(प्रतिनिधी )

-ज्येष्ठ नागरिक संघाच्या द्वीदशक वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक 1 मे 2022 रोजी सकाळी १० वाजता स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . या कार्यक्रमास जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकांनी उपस्थित रहावे ,असे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अभियंते आर. बी. जोशी , सचिव प्रकाश घादगिने यांनी केले आहे .
… रविवार दि.1 मे रोजी सकाळी दहा वाजता सावेवाडी भागातील पूर्णानंद मंगल कार्यालयात महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष अरुण रोडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक व संत साहित्याचे अभ्यासक अँड. रामचंद्र देखणे , अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, फेसकॉम महिला आघाडी प्रमुख डॉ. सौ. माया कुलकर्णी , ज्येष्ठ नागरिक संघ दक्षिण मराठवाडा विभागीय अध्यक्ष डॉ. बी. आर .पाटील इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत .यावेळी ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न व समस्या यावर प्रमुख पाहुणे मार्गदर्शन करणार आहेत.


. या कार्यक्रमास लातूर जिल्ह्यातील स्त्री-पुरुष ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघाच्या लातूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष अभियंते बी .आर .जोशी उपाध्यक्ष डॉ. काशिनाथ सलगर , सचिव प्रकाश घादगिने, कोषाध्यक्ष वसंत बेंडे, सहसचिव शहाजी घाडगे , कार्यकारिणी सदस्य प्रकाश नीला ,रमेश भोयरेकर , डॉ.भास्कर बोरगावकर ,शकुंतला यादव आदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]