23.6 C
Pune
Thursday, October 30, 2025
Homeठळक बातम्याडॉ. संतुजी लाड यांची जयंती, पुण्यतिथी शासन स्तरावर साजरी करा

डॉ. संतुजी लाड यांची जयंती, पुण्यतिथी शासन स्तरावर साजरी करा

सत्यशोधक डॉ संतुजी रामजी लाड यांची जयंती , पुण्यतिथी शासन स्तरावर साजरी करुन त्यांचे नावे सामाजिक पुरस्कार सुरू करण्याची अखिल भारतीय संतुजी ब्रिगेडची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्र्याकडे मागणी

लातूर ;दि.१९
सत्यशोधक डॉ संतुजी रामजी लाड यांची जयंती पुण्यतिथी शासन स्तरावर साजरी करुन त्यांचे नावे सामाजिक पुरस्कार सुरू करण्याची अखिल भारतीय संतुजी ब्रिगेडची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना धनजय मुंढे साहेब यांच्या कडे मागणी करण्यात आली आहे
अखिल भारतीय संतुजी ब्रिगेडचे महासचिव अँड अमितकुमार कोथमिरे यांनी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना धनजंय मुंढे साहेब यांच्या कडे मुंबई येथील मंत्रालयातील त्यांच्या दालनात निवेदनाद्वारे व ना संजय जी बनसोडे साहेब, राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शिफारस पत्रासह सत्यशोधक समाजाचे अग्रदूत तथा महात्मा जोतिबा फुले यांचे सहकारी, शिष्य, हिंदु खाटीक समाजभुषण सत्यशोधक डॉ संतुजी रामजी लाड यांनी उभे आयुष्य बहुजन समाजाच्या जागृतिसाठी संघटन कामी आयुष्य वेचलं म्हणूनच लोकनेते मा खा शरदचंद्र जी पवार ,यांच्या लोक माझे सांगाती, राजकीय आत्मकथेत व जवळपास १५ विविध ग्रंथ, पुस्तकातून डॉ संतुजी रामजी लाड यांच्या जीवन कार्याचा नामोल्लेख गौरव करण्यात आलेला आहे
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना डॉ विरेंद्रकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ आंबेडकर फाऊंडेशन अंतर्गत डॉ संतुजी रामजी लाड यांचा महामानवाच्या यादीत समावेश करून जयंती पुण्यतिथी साजरी करण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार असल्याचे दि १३.४.२०२२ चे परिपत्रक ना मुंढे यांना निदर्शनास आणून दिले आहे
सत्यशोधक बहुजन चळवळीतील डॉ संतुजी रामजी लाड यांची जयंती,पुण्यतिथी शासन स्तरावर साजरी करण्यात यावी व तसेच सामाजिक क्षेत्रातील भरीव कार्य, जाती निर्मूलन, अस्पृश्यता निवारण, सर्वधर्म सदभाव वाढीचे कार्य, महीला बाल कल्याण, आदिवासी, वैद्यकीय सेवेतील कार्यासाठी डॉ संतुजी रामजी लाड यांच्या नावे सामाजिक पुरस्कार सुरू करून अनुसूचित जाती प्रवर्गातील महाराष्ट्रातील खाटीक समाजाला न्याय द्यावा ही विनंती करण्यात आली आहे यावेळी महासचिव अँड अमितकुमार कोथमिरे,महाराष्ट्र खाटीक समाजाचे नेते अँड व्यकटराव बेंद्रे, विनोद गायकवाड आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]