21.1 C
Pune
Thursday, October 30, 2025
Homeमहाराष्ट्रजयप्रकाश दगडे यांना पुरस्कार प्रदान

जयप्रकाश दगडे यांना पुरस्कार प्रदान


लातूर
महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समितीचे माजी सदस्य जयप्रकाश दगडे यांना नुकताच पत्रकारिता, लेखन व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी सन 2022 चा ‘कर्मयोगी डाॅ. बालासाहेब ठोंबरे-पाटील स्मृती समाजसेवा पुरस्कार ‘ प्रदान करण्यात आला.
कर्मयोगी डाॅ. बालासाहेब ठोंबरे- पाटील स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या सोहळ्यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॅ अशोक ढवण यांच्या हस्ते उंदरी ( केज ) येथे हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. विचारमंचावर अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष रमेशराव आडसकर, नंदकिशोर मुंदडा, बीडच्या अपर जिल्हा पोलीस अधीक्षक कविता नेरकर- पवार, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नणंदकर, माजी शिक्षण संचालक डाॅ.मारोतराव ढोबळे, नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॅ. मधुकरराव गायकवाड, मराठवाडा जनता विकास परिषदेचे उपाध्यक्ष व इतिहासतज्ञ डाॅ. सोमनाथ रोडे, प्रतिष्ठानचे डाॅ. बाबासाहेब ठोंबरे- पाटील यांची उपस्थिती होती.


या सोहळ्यात दत्तात्रय शिंदे ( कृषी ), प्रदीप नणंदकर ( कृषी पत्रकारिता ) , कविता नेरकर- पवार ( महिला सक्षमीकरण व प्रशासन ), मधुकर वडोदे ( साहित्य), प्रभाकर जावळे ( भक्त पुंडलिक ) सोमनाथ माने ( कृषी संशोधन ), रशीद पठाण ( सद्भावना ), डाॅ.भगवानराव ठोंबरे ( ग्रामभूषण ), रामेश्वर मांडगे ( कुशल कारभारी किसान ) आणि श्रीमती जतनबाई बालचंदजी सोलंकी ( कुशल कारभारी किसान ) यांनाही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी ‘काव्यसंध्या ‘ हे निमंत्रितांचे महिला कविसंमेलन संपन्न झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]