एमआयटी उभारणार रुग्णालय

0
229

 

एमआयटी उभारणार दोनशे खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय

सुपरस्पेशालिटी रुग्णालय व वस्तीगृहाचे प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न्‍

लातूर, दि. 24 – येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय परिसरात उभारण्यात येणाऱ्या सुपरस्पेशालिटी रुग्णालय व वस्तीगृहाचे भूमीपूजन माईर एमआयटी, पुणेचे संस्थापक-विश्वस्त प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते करण्यात आले.

एमआयटीचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय हे दोनशे खाटांचे असणार असून ते सर्व अत्याधुनिक सोयींयुक्त असणार आहे. या सुपरस्पेशालिटी रुग्णालयात ह्रदयारोग उपचार व शस्त्रक्रिया (अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी), जठर व यक्रत रोग उपचार व शस्त्रक्रिया, मुत्ररोग उपचार व शस्त्रक्रिया, मेंदू रोग उपचार व मणक्याच्या शस्त्रक्रिया, नेत्र रोग उपचार व शस्त्रक्रिया, संधीरोग (वात) उपचार व शस्त्रक्रिया, लहान मुलांवरील उपचार व शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, ब्रॉन्कोस्कोपी, युट्रेसस्कोपी, ऑर्थोस्पोकी उपचार व शस्त्रक्रिया, मधुमेह उपचार, वंध्यत्व निवारण, सर्जिकल आयसीयु, लहान मुले व नवजात शिशुंसाठी एनआयसीयु, ट्रामा केअर सेंटर व अत्यावश्यक वैद्यकीय सेवांसह सर्व प्रकारचे सुपरस्पेशालिटी उपचार व शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सुपरस्पेशालिटी रुग्णालय परिसरात वैद्यकीय शाखेच्या पद्व्युत्तर विद्यार्थ्यांसाठी 200 विद्यार्थी क्षमतेचे सुसज्ज असे वस्तीगृह बांधण्यात येणार आहे.

या भूमीपूजन कार्यक्रमासाठी रामेश्वरचे माजी सरपंच तुळशीराम दा. कराड, प्रगतीशिल शेतकरी काशीराम दा. कराड, सौ. उषाताई विश्वनाथ कराड, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक आ. रमेशअप्पा कराड, कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड, अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार, उप अधिष्ठाता डॉ. बी. एस. नागोबा, प्रशासकीय व शैक्षणीक संचालीका डॉ. सरिता मंत्री, रुग्णालय अधिक्षक डॉ. एच. एच. जाधव, डॉ. वर्षा कराड, एमआयडीएसआर दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश कांबळे, एमआयपी फिजीओथेरपी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पल्लवी जाधव, एमआयएनएस नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य सर्वनन सेना, बालासाहेब कराड यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख, डॉक्टर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here