लातूर : अभिजात फिल्म सोसायटीच्या वतीने रविवार, 26 जून 2022 रोजी यशोदा चित्रपटगृहात वाय चा खास शो आयोजित केला आहे. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. अजित वाडीकर व प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेत्री मुक्ता बर्वे उपस्थित राहणार आहेत .
सध्या समाजाला भेडसावणारा ज्वलंत सामाजिक प्रश्न मांडणारा हा चित्रपट प्रत्येकाने पहावा असा आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. वाडीकर हे उदगीर येथील असून त्यांनी निर्मिलेल्या या चित्रपटाची अनेक मान्यवरांनी प्रशंसा केली आहे. हा चित्रपट नावाजलेल्या फिल्म फेस्टिव्हल मध्ये दाखविला गेला असून समिक्षकांनी देखील त्याचे कौतुक केले आहे.

मराठी चित्रपटात हायपरलिंक या संकल्पनेवर आधारित असा हा पहिलाच चित्रपट असून लातुर परिसरात त्याचे चित्रिकरण झालेले आहे. अनेक स्थानिक कलावंत यामध्ये विविध भूमिकेत आहेत. रसिकांनी हा चित्रपट अवश्य पहावा, असे आवाहन अभिजात फिल्म सोसायटीने केले आहे. अधिक माहितीसाठी 9422071191 या क्रमांकावर संपर्क साधावा.




