23.5 C
Pune
Saturday, June 21, 2025
Homeराजकीय*अनेकांचा भाजपात प्रवेश*

*अनेकांचा भाजपात प्रवेश*

आ. रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत 

डिगोळ तांडा येथील अनेकांचा भाजपात प्रवेश

अनुसूचित जाती मोर्चाच्या तालुका उपाध्यक्षपदी प्रभाकर देडे यांची नियुक्ती

       लातूर दि. २०– रेणापूर तालुक्यातील मौजे डिघोळ देशमुख ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या डिगोळ तांडा येथील अनेकांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी भारतीय जनता पार्टी मध्‍ये प्रवेश केला. यावेळी डिघोळ देशमुखचे सरपंच प्रभाकर देडे यांना अनुसूचित जाती मोर्चाच्या तालुका उपाध्यक्षपदी निवडीचे नियुक्ती पत्र देण्यात आले.

प्रवेश केलेल्या सर्वांना भाजपात सन्मानाची वागणूक मिळेल त्याचबरोबर आपल्या परिसराचा वस्तीचा पर्यायाने गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्‍य शासनाच्या वतीने विविध योजना प्रभावीपणे राबवल्या जातील अशी ग्वाही देवून आ. रमेशआप्पा कराड यांनी गेल्‍या ४० वर्षात जेवढा गावाला विकास निधी मिळाला नाही तेवढा येत्‍या २ वर्षात मिळेल असे अभिवचन दिले. सर्वांनी एका विचाराने एकजूटीने येत्‍या काळात होणा-या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकवा असे आवाहन केले. 

याप्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष अॅड. दशरथ सरवदे, भाजपा आध्यात्मिक सेलचे जिल्हा संयोजक माऊली भिसे, अनुसूचित जाती मोर्च्याचे तालुकाध्यक्ष अजित गायकवाड, दत्ता पाटील, व्यंकटी राठोड, रांनबा मुळे, उपसरपंच बाबासाहेब जोगदंड यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी अनेकांनी आ. रमेशआप्पा कराड यांचा सत्कार केला.

       दिघोळ देशमुख तांडा येथील सुंदर रतन राठोड, प्रकाश शंकर राठोड, बब्रुवान धोंडीराम जाधव, बजरंग रामा जाधव, संतोष नामदेव जाधव, संजय राजेभाऊ राठोड, व्यंकट रूपचंद राठोड, कैलास उत्तम राठोड, सुभाष धनु जाधव, बालासाहेब किशन राठोड, बालासाहेब परसराम जाधव यांच्यासह अनेकांनी यावेळी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]