मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सर्वांना फडणवीसांनी संपवलं – विनायक राऊत
सिंधुदुर्ग। शिवसेना नेते आणि खासदार विनायक राऊत यांनी भाजपमधील धुसफुशीवरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता जोरदार निशाणा साधला आहे. भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जे जे नेते होते. त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचं काम केलं आहे, असा आरोप विनायक राऊत यांनी केला.
दिवंगत भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या नेत्या प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळे प्रीतम मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा केंद्रीय मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर चर्चा सुरू होत्या. त्यावरून आता शिवसेनेने भाजपवर टीका करायला सुरुवात केली आहे.