*अन्नत्याग आंदोलन*

0
372

शेतकर्‍यांप्रती संवेदनहीन असलेल्या सरकारला जागे करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन-आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
पालकमंत्र्यांना खुली चर्चा करण्याचे पत्रकार परिषदेत आव्हान
लातूर – शेतकर्‍यांप्रती समुदाय संवेदनाहीन झालेल्या आघाडी सरकारला आणि पालकमंत्र्यांना जाग आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने 11, 12 व 13 ऑक्टोबर रोजी लातुरात अन्नत्याग आंदोलन केले जाणार असल्याची माहिती भाजपा नेते आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जुलै महिन्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाने नुकतेच 365 कोटी रूपये जाहीर केले आहेत. मात्र यामध्ये लातूर जिल्ह्याचा समावेश नसल्याची माहिती देत आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी ही मदत मिळवून देण्यात पालकमंत्री अपयशी ठरल्याचा आरोप करीत शेतकर्‍यांप्रती संवेदना नसलेल्या पालकमंत्र्यांनी शेतकर्‍यांसाठी आणि जिल्ह्यासाठी गेल्या दोन वर्षात काय केले याची खुली चर्चा करावी असे आव्हान यावेळी आ.निलंगेकर यांनी दिले.


परिषदेत बोलताना आमदार निलंगेकर म्हणाले शेतकर्‍यांसमोर अनंत समस्या उभ्या आहेत शेतकरी त्रासून गेलेला आहे परंतु पालकमंत्र्यांना आणि सरकारला त्याचे काहीही देणेघेणे नाही मागील काळात जे नेहमी टक्केवारीचा आरोप करीत होते ते आता कोणत्या टक्केवारीत अडकून पडले आहेत आहेत याचा खुलासा त्यांनी जनतेला करावा. विमा कंपन्यांचा फायदा करणे म्हणजे शेतकर्‍याचा नुकसान करणारा आहे त्यांना समजत नाही का असा खडा सवाल निलंगेकर यांनी केला. भाजपा गेली दोन वर्ष सक्षम विरोधी पक्ष म्हणून लढत आहे आम्ही योग्य वेळी लढा देतो आणि कोरोना च्या काळात आम्ही सरकारला साथ दिली आहे परंतू अन्नदाता शेतकरी आज मदतीसाठी आक्रोश करत असताना सरकारला पालकमंत्र्यांना जाग येत नाही ते कुंभकर्णासारखे झोपले आहेत त्यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांचं अतोनात नुकसान होत आहे शेतकर्‍यांचे प्रश्न शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी अन्नत्याग आंदोलन आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सामाजिक राजकीय संघटनांनी सुद्धा पक्षीय वैचारिक मतभेद बाजूला ठेवून शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी या अन्नत्याग आंदोलन आता सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केले. पालकमंत्री अमित देशमुख यांनी गेल्या दोन वर्षात जिल्हा परिषदेसाठी महापालिकेसाठी किंवा जिल्ह्यातल्या सार्वजनिक कामासाठी कोणता भरीव निधी आणला याची जाहीर पत्रकारांच्या समक्ष आमनेसामने चर्चा करावी असं आम्ही त्यांना आव्हान देत असल्याचेही संभाजी पाटील म्हणाले या नैसर्गिक आपत्ती नंतर राज्य सरकारच्या दोन कॅबिनेट बैठका झाल्या या दोन बैठक आत लातूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी पालकमंत्र्यांनी कोणता अहवाल सादर केला किती मदत मागितली त्यासाठी किती वेळा आवाज उठवला याची माहितीही त्यांनी द्यावी असं आवाहन यावेळी करण्यात आला जे मुख्यमंत्री त्यांच्या कॅबिनेट मंत्री मधील मंत्र्यांना भेटत नाहीत ते मराठवाड्यातील आमच्यासारख्या आमदाराला काय भेटणार त्यापेक्षा अन्नत्याग आंदोलन करून त्यांना जाग आणण्याचे काम आम्ही करणार असल्याचं एका प्रश्नाच्या उत्तरात आमदार निलंगेकर यांनी स्पष्ट केले.

जुलै महिन्यात लातूर जिल्ह्यातील कांही भागामध्ये ढगफुटी सदृष्य परिस्थिती निर्माण होवून अतीवृष्टी झालेली होती. यामध्ये झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकर्‍यांना मदत द्यावी अशी मागणी आम्ही शासन व प्रशासन यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. मात्र हि मदत जाहीर झालेली नसून जुलै महिन्यात अतीवृष्टीच्या नुकसानीपोटी सरकारने 365 कोटी रूपये जाहीर केलेले असले तरी यामध्ये लातूर जिल्ह्याचा समावेश नसल्याचा धक्कादायक खुलासा आ.निलंगेकर यांनी यावेळी केला. यावरूनच पालकमंत्री यांना जिल्ह्यातील शेतकर्‍यांप्रती कोणत्याच संवेदना नसल्याचे स्पष्ट होते असे आ.निलंगेकर यांनी यावेळी सांगितले.
सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीस पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना पत्र देवून जलप्रकल्पात साठणारे पाणी तात्काळ कालव्याद्वारे सोडावे अशी मागणी करून आगामी काळात पाऊस पडला तर त्याची साठवणूक योग्य पध्दतीने होईल असेही यामध्ये नमुद केले होते. मात्र या मागणीकडेही दुर्लक्ष केल्याने अतीवृष्टीनंतर अचानकपणे जलप्रकल्पातील पाणी नदीपात्राद्वारे सोडल्याने जिल्ह्यात जे शेतीचे नुकसान झाले त्याची जबाबदारी पालकमंत्र्यांचीच असून या जबाबदारीपोटी पालकमंत्र्यांनी शेतकर्‍यांना त्याची उत्तरे देवून तात्काळ याबाबतचा खुलासा करावा अशी मागणीही आ.निलंगेकर यांनी केली.


यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांनी अतीवृष्टीने जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची माहिती देवून सदर नुकसानीची पाहणी भाजपाच्यावतीने करण्यात आलेली असून आता शासनाने सरसकट मदत जाहीर करून ज्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत त्यांना विशेष अनुदान द्यावे अशी मागणी यावेळी केली. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना व आघाडी सरकारला शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांशी कांही देणे-घेणे नसल्यामुळे अतीवृष्टी झाल्यानंतर दोन मंत्रीमंडळाच्या बैठका झाल्या तरी यामध्ये अतीवृष्टीच्या नुकसानभरपाईसाठी कोणतीच चर्चा अथवा घोषणा झाली नाही. यावरूनच हे सरकार मराठवाडा व शेतकरी विरोधी असल्याचे दिसून येते. यापुर्वीही शेतकर्‍यांसाठी आम्ही ज्या मागण्या केलेल्या त्या मागण्या पुर्ण होण्यासाठीच आता झोपलेल्या सरकारला जागे करण्याकरिता अन्नत्याग करण्यात येत असल्याची माहिती आ.रमेश कराड यांनी यावेळी दिली. या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मुळे, जि.प.सभापती रोहीदास वाघमारे, बापूसाहेब राठोड, मनपा गटनेते शैलेश गोजमगुंडे, पंडीत सुर्यवंशी आदिंची उपस्थिती होते.
मिसकॉल अभियान
अतीवृष्टीने ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झालेले आहे. त्या नुकसानीची माहिती घेण्याकरिता आणि त्यांना मदत मिळवून देण्यासाठी भाजपाच्यावतीने मिसकॉल अभियान राबविण्यात येत आहे. याकरिता 8094017272 हा नंबर असून यावर मिसकॉल करत शेतकर्‍यांनी आपल्या नुकसानीची माहिती द्यावी आणि त्याचबरोबर जे अन्नत्याग अंदोलन करण्यात येत आहे त्यासाठी पाठींबाही द्यावा असे आवाहन यावेळी माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here