24.1 C
Pune
Thursday, October 30, 2025
Homeताज्या बातम्या*अपघातात जखमी झालेल्या रुग्णाची भेट घेऊन सर्वतोपरी मदत करण्याच्या आमदार संजय बनसोडे...

*अपघातात जखमी झालेल्या रुग्णाची भेट घेऊन सर्वतोपरी मदत करण्याच्या आमदार संजय बनसोडे यांच्या सूचना*

उदगीर 🙁 प्रतिनिधी)- उदगीर तालुक्यातील लोहारा गावाजवळ तुळजापूर येथील देवीचे दर्शन घेऊन उदगीरला परत येत असताना आज सकाळी बस आणि कारच्या अपघातात उदगीर येथील सहा तरुणांचा अपघात झाला या अपघातात दोन तरुण व तीन तरुणी मयत तर एक तरुणी जखमी झाली असल्याचे वृत्त उदगीर मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांना समजताच त्यांनी सामान्य रुग्णालय उदगीर व पोलीस प्रशासनाला अपघात झालेल्या तरुणांना मदत करण्याच्या सुचना केल्या.


या अपघातात मयत झालेल्या पाच जणांना आमदार बनसोडे यांनी श्रद्धांजली वाहून त्यांच्या कुटुंबीयांसोबत आपण असल्याचे सांगुन मयताचे शवविच्छेदन करुन नातेवाईकांना देण्याच्या सुचना सामन्य रूग्णालयातील आरोग्य विभागाला दिल्या.

या अपघातात प्रियंका बनसोडे ही तरुणी जखमी असून तिला तातडीने उदगीरच्या सामान्य रुग्णालयातून लातूर येथील
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवावे अशा सूचना करून आमदार संजय बनसोडे हे बैंगलोर येथे गेले होते मात्र त्यांना आपल्या मतदार संघात हा गंभीर अपघात झाल्याचे वृत्त समजताच ते तातडीने बैंगलोरहुन थेट लातूरला आले व जखमी असलेल्या प्रियंका बनसोडे व त्यांच्या नातेवाईकांना लातूर येथील शासकीय रूग्णालयात प्रत्यक्ष
भेटून त्यांना धीर दिला आणि आर्थिक मदत करून रुग्णालयातील डॉक्टरांना योग्य ते औषध उपचार करावा व कुठलीही निष्काळजी न करता उपचार करण्यासाठी सूचना केल्या.
यावेळी आमदार संजय बनसोडे यांच्यासोबत रुग्णालयाचे डिन डॉ. सुधीर देशमुख, डॉ. हनुमंत किनीकर, प्रशांत पाटील होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]