Homeसामाजिक*अभियंते गणेश गाडगीळ (पीएनजी) यांना “अभियंता जानाईश्री “ पुरस्कार जाहीर*

*अभियंते गणेश गाडगीळ (पीएनजी) यांना “अभियंता जानाईश्री “ पुरस्कार जाहीर*



जानाई प्रतिष्ठानचा अभियंतादिन  उपक्रम 
लातूर ; ता १५:
> १५ सप्टेंबर अभियंता  दिना  निमित्त श्री जानाई प्रतिष्ठान लातूर या संस्थेच्या वतीने दिला जाणारा “अभियंता जानाईश्री ”  पुरस्कार सांगली अर्बन बॅंकचे अध्यक्ष, पीएनजी चे संचालक अभियंता गणेश गाडगीळ यांना जाहीर करण्यात आला. कार्याप्रती निष्ठा व समाजाप्रती बांधिलकी जपणा-या अभियांतीची या पुरस्कारासाठी निवड केली जाते.
> महावस्त्र, सन्मानचिन्ह , सन्मानपत्र,सर विश्वेश्वरय्या फेटा, रू १५,०००/- असे ह्या  पुरस्काराचे स्वरूप आहे. शनिवार दिनांक २४ सप्टेबर रोजी सांय ६ वा. जानाई फंक्शन हाॅल, गीताई संकुल, मित्र नगर येथे अभियंता गणेश गाडगीळ यांना “ अभियंता जानाईश्री ” पुरस्कार देवून  सन्मानित केले जाणार आहे .


अभि.गणेश गाडगीळ यंत्र अभियंता असुन ते सुप्रसिध्द पु.ना.गाडगील सराफ व जेव्हरी या संस्थेचे ते भागीदार, पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिध्द सांगली अर्बन बॅंकेचे ते विद्यमान अध्यक्ष, सहकार भारती महा. प्रांताचे कोषाध्यक्ष आहेत.
> याच कार्यक्रमात प्रतिष्ठानने निवड केलेल्या अभियांत्रीकी महाविद्यालयातील  गरजू, हुशार, होतकरू, पंधरा विद्यार्थ्यांच्या प्रवेशशुल्काचे धनादेश अभि. गणेश गाडगीळ यांच्या हस्ते वितरीत केले जाणार आहेत.
>पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित  रहावे  असे आवाहन अतुल ठोंबरे, डाॅ वैशाली टेकाळे , प्रसाद उदगीरकर, संजय प्र.अयाचित,  डाॅ ऋजुता अयाचीत, अर्कि.विजय सहदेव, शिवाजी कांबळे, प्रा.दत्ता मुढे, मनोज सप्तर्षी, महेश औरादे , विजय चोळखने, डाॅ.विश्वास कुलकर्णी,डाॅ.राजेश पाटील, डाॅ. पी.के.शहा, अमोल  तांदळे, भूषण दाते, सौरभ ताथोडे, अवधुत जोशी, गौरव कुलकर्णी, वैष्णवी दिवान, गायत्री पत्की कांचन इस्लामपुरे,  अमृता कदम, चैतन्य सावंत यांनी केले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments