अष्टविनायक प्रतिष्ठान व आवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी पहाटचे आयोजन
पं.ओंकार दादरकर यांच्या स्वरांनी होणार लातूरकरांची दिवाळी सुरेल.
लाातूर दि.1 प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी अष्टविनायक प्रतिष्ठान व आवर्तन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने याहीवर्षी दिवाळी पहाट संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात कोलकाता येथील ग्वाल्हेर घराण्याचे उदयोन्मुख कलावंत पं.ओंकार दादरकर यांचे शास्त्रीय गायन सादर होणार आहे.त्यांना तबल्याची साथसंगत पुणे येथील सुप्रसिद्ध तबलावादक श्री गणेश तानवडे हे करणार आहेत तर हार्मोनियमची साथसंगत हुमानाबाद,माणिकनागर येथील श्री अजय सुगावकर हे करणार आहेत.
या कार्यक्रमासाठी उदघाटक म्ह्णणून माजी मंत्री दिलीपराव देशमुख हे उपस्थित राहणार आहेत तर मनपा आयुक्त आमनजी मित्तल,अष्टविनायक प्रतिष्ठानचे विश्वस्त दिलीप माने यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

लातूरकरांची दिवाळी ही सूरमयी व्हावी व दिवाळी सणाचा आनंद द्विगुणीत व्हावा यासाठी मागील सात वर्षांपासून अष्टविनायक प्रतिष्ठान व आवर्तन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी पहाट संगीत समारोहाची सुरुवात करण्यात आली.यातून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलावंतांनी लातूरकरांना मनमुराद आनंद दिला आहे.याही वर्षी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलावंत पं.ओंकार दादरकर हे ख्याल,ठुमरी,दादरा अशा शास्त्रीय गायन प्रकारांची बरसात करून लातूरकरांची दिवाळी आनंददायी करणार आहेत.

ही मैफल गुरुवार दि 4 नोव्हेंबर रोजी अष्टविनायक मंदिराच्या प्रांगणात पहाटे 5:30 वाजता संपन्न होणार आहे.याच दिवशी अष्टविनायक मंदिर परिसरात हजारो दिव्यांची आरास होणार आहे.ही मैफल सर्वांसाठी निःशुल्क स्वरूपात खुली असणार आहे.या दिवाळी पहाट कार्यक्रमाचा लाभ अधिकाधिक संगीत रसिकांनी घ्यावा असे आवाहन अष्टविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप राठी,आवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय शहा,सचिव डॉ. रवी पोरे,किरण भवठाणकार,प्रा. शशिकांत देशमुख,डॉ.संदीप जगदाळे,प्रा. हरीसर्वोत्तम जोशी,संजय सुवर्णकार,वाय एस मशायक,नवनीत भंडारी यांनी केले आहे.
——————











