भाजपा जिल्हाध्यक्ष आ.रमेशअप्पा कराड यांच्याहस्ते
शिवाजीराव पाटील कव्हेकरांचा सत्कार
लातूर दि.21-08-2021भारतीय जनता पार्टीचे नेते, शेतकर्यांचे कैवारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांची भारतीय जनता पार्टी किसान मोर्च्याच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या सदस्यपदी निवड झाली असून भाजपा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आ.रमेशअप्पा कराड यांच्याहस्ते माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांचा त्यांच्या मजगे नगर येथील कैलास निवासस्थानी शाल,श्रीफळ व संत ज्ञानेश्वर महाराजांची मुर्ती देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर आणि रमेशअप्पा कराड यांच्यात विविध विषयावर चर्चा झाली. यावेळी आ.रमेश कराड यांनी कव्हेकर साहेबांचा कृषी विषयात खुप मोठा अभ्यास असल्याने त्याचा फायदा निश्चितच भाजपा किसान मोर्च्याला होईल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान व्यक्त केली.
यावेळी भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, अखील भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप पाटील खंडापूरकर, पत्रकार रामेश्वर बद्दर,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद नरहरे, सतीश अंबेकर, वसंत करमुडे, रेणापूर प.स.चे उपसभापती, अनंत चव्हाण, दिलीप धोत्रे, अमोल पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.











