आगामी महापालिका निवडणुकीत 80 टक्के तरुणांना उमेदवारी देणार- संभाजी पाटील निलंगेकर..
लातूर- आगामी महापालिका निवडणुकीत 80 टक्के तरुणांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी देण्यात येणार असून युवकांनी यासाठी पुढे यावे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार कौशल्य तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूर येथे केले.
लातूर येथील अनुसया मंगल कार्यालय येथे एकता प्रतिष्ठान च्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव तथा मीडिया पॅनलिस्ट प्रेरणा होनराव आदी मान्यवर उपस्थित होते.
एकता प्रतिष्ठान हे गेल्या अनेक वर्षांपासून गणेश मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. प्रेरणा ताई होनराव यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रतिष्ठान काम करत आहे या वर्षी त्यांनी कोरोना काळात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करावा अशी संकल्पना त्यांच्या मनामधे निर्माण झाली आणि त्या माध्यमातून त्यांनी लातूर शहरात कोरोनाच्या काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांचा व व्यक्तींचा सन्मान केला.

यावेळी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव तथा मीडिया पॅनलिस्ट प्रेरणा होनराव मनोगत व्यक्त करताना म्हणाले की ,लातूर जिल्ह्यामध्ये माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मुळे मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी आली असून येणाऱ्या काळात या कोचच्या माध्यमातून अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत यासाठी युवकांनी सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात काम करत असताना याकडे सुद्धा डोळस नजरेने लक्ष द्या व व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घेत त्यासोबत आपले देखिल उद्योग डोळसपणे उभे करावेत असे त्यांनी मनोगतात म्हटले आहे,सोबतच एकता प्रतिष्ठाचे कमी वेळेत उत्तम सामाजिक जाणिवा सांभाळत असल्याने कौतुक देखिल केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या कार्यक्रमासाठी एकता प्रतिष्ठानचे श्री.विजय कस्पटे,श्री.वैभव पतंगे,श्री.आकाश मोरे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता .











