25.6 C
Pune
Wednesday, October 29, 2025
Homeआंतरराष्ट्रीयआंतरराष्ट्रीय सन्मान

आंतरराष्ट्रीय सन्मान

आंतरराष्ट्रीय दंत चिकित्सा आणि मुख आरोग्य परिषदेत

एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील 16 संशोधनास आंतरराष्ट्रीय पारितोषिक

लातूर, दि. 1 –

एशिया – पॅसिफिक दंत आणि मुख आरोग्य संघटनेच्या वतीने प्रोजेक्टींग द मॉडर्न टेक्नीक इन डेन्टीस्ट्री ॲण्ड इटस फ्युचर या विषयावर चौथी आभासी आंतरराष्ट्रीय दंत चिकित्सा आणि मौखीक आरोग्य परिषद नुकतीच घेण्यात आली. या परिषदेत एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील तीन संशोधकांच्या संशोधनास प्रथम तर दोन संशोधकांच्या संशोधनास व्दितीय तर चार जणांना तृतीय आंतराष्ट्रीय पारितोषिक मिळाले आहे. त्यासोबतच सात संशोधकांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले असून जगभरातील पाचशेपेक्षा अधिक दंत संशोधकांनी या परिषदेत आपले संशोधन सादर केले.

या परिषदेत एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील डॉ. यतीशकुमार जोशी यांनी ऑर्थो डोन्टीक्स श्रेणीतील संशोधन सादर केले तर पेरिओ डॉन्टिक्स दंत चिकित्सा या श्रेणीत डॉ. गौरी उगले आणि डॉ. रोहिणी माले यांनी संशोधन सादर केले. या तिन्ही संशोधनास प्रथम पारितोषिक मिळाले. तसेच ओरल पॅथॉलॉजी या श्रेणीत डॉ. वर्षा सांगळे, ओरल सर्जरी या श्रेणीत डॉ. पुनम नागरगोजे यांच्या संशोधनास व्दितीय, ओरल मेडिसीन ॲण्ड रेडिओलॉजी या श्रेणीत डॉ. विजयालक्ष्मी माले, ओरल पॅथॉलॉजी या श्रेणीत डॉ. स्मिता चावरे, ओरल मेडिसिन ॲण्ड रेडिओलॉजी या श्रेणीत डॉ. प्रियंका लसुणे व बाल दंत चिकित्सा या श्रेणीत डॉ. मयुर दुग्गड यांना तृतीय पारितोषिक मिळाले. त्याचबरोबर डॉ. शिल्पा केंद्रे, डॉ. अजय सोरटे, डॉ. जोत्सना, डॉ. शिवानी, डॉ. अशुतोष आग्रवाल, डॉ. शितल, डॉ. पुनम या संशोधकांनी दंत शाखेविषयी सादर केलेल्या संशोधनास उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

या परिषदेत एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील डॉ. आनंद आंबेकर व डॉ. गौरी उगले यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले तर आयोजक समिती सदस्य म्हणून डॉ. यतीशकुमार जोशी, डॉ. वर्षा सांगळे, डॉ. गौरी उगले, डॉ. अश्विनी बिरादार, डॉ. शशी पाटील यांनी काम पाहिले. भविष्यातही अशा परिषदा घेण्यासाठी एमआयडीएसआर दंत महाविद्यालय पुढाकार घेणार असून दंत क्षेत्रातील बदलती शिक्षण पध्दती अंगीकारुण आधुनिक तंत्रज्ञानाची देवान-घेवान करुन जागतिक पातळीवर दंत शाखेत एक समानता आणणे हा या मागील हेतू आहे. तसेच अशा परिषदा व स्पर्धा मध्ये एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घ्यावा, असे मत प्राचार्य डॉ. सुरेश कांबळे यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय दंतचिकित्सा आणि मौखीक आरोग्य परिषदेत एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील संशोधनास पुरस्कार मिळाल्याबद्द्ल सर्व संशोधकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या परिषदेत एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील एकूण 51 दंत तज्ज्ञांनी सहभाग नोंदवला तर 20 संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर केले. एमआयडीएसआर दंत महाविद्यालय हे या परिषदेचे सहआयोजक होते.

——————————————————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]