आदरांजली

0
224

आनंद मरा नहीं आनंद मरते नहीं “

 

हिंदी चित्रपट सृष्टीचा पहिला सुपरस्टार जतीन खन्ना उर्फ राजेश खन्ना याला जगातून एक्सिट घेऊन 18 जुलै ला 9 वर्षे पूर्ण होतील त्याला भावपूर्ण आदरांजली .

1969 साली प्रदर्शित झालेल्या आराधनाच्या सुपरडूपर यशानंतर या सुपरस्टार अभिनेत्याने मागे वळून कधी बघितलेच नाही अमरप्रेम , दाग , दुष्मन, अनुरोध ,आन मिलो सजना, हाथी मेरे साथी ,कटी पतंग , सफर , दो रास्ते ,मेहबूब की मेहंदी, खामोशी यासारखे एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट या सुपरस्टारने दिले . या चित्रपटातील गाणीही त्याने आपल्या असण्याने प्रेक्षणीय केली.

आनंद चित्रपटाशिवाय त्याच्याबद्दल लिहिणे म्हणजे त्याच्यावर अन्यायच असण्यासारखे आहे हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीचा आणि अर्थातच अभिनयाचा माईलस्टोन होता हे म्हणणे वावगे ठरणार नाही , ह्या चित्रपटातील संवाद आजही ऐकताना आणि पाहताना डोळ्यात पाणी आणतात

“जिंदगी और मौत उपरवाले के हाथ है जहाँपनहा …उससे ना आप बदल सकते है और ना मैं …हम सब रंगमचकी कठपुतलीया है जिनकी डोर उपर वाले की उनगलियोमे बंधी है …कब कौन कैसे उठेगा कोई नही बता सकता..हा हा हा !

त्याच्या आयुष्याच्या अखेरच्या दिवसात त्याला एक प्रश्न विचारला गेला , तु आता ही सुपरस्टारची लोकप्रियता मिस करत आहेस का , तर त्याने उत्तर दिले हो मला फार कठीण जात आहे हे सांगायला की लोक आता मला विसरली आहेत पण मी जेव्हा या जगातून जाईन तेव्हा हीच लोक मला , माझ्या चित्रपटांना आणि त्यातील गाण्यांना नक्कीच आठवत राहतील .

चित्रपटसृष्टीतील हा “आनंद” त्याच्या जगातून जाण्यानन्तर पण चित्रपट रसिकांच्या मनातून कधीच गेला नाही तर हा पहिला सुपरस्टार त्यांच्या हृदयात आजही अढळस्थानीच आहे.

मंदार दामले

साभार : फेसबुक

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here