सायकल दान महाअभियान “सायकल बँक “
लातूर
सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या आदर्श मैत्री फाऊंडेशन चे अध्यक्ष संतोष बिराजदार व सर्व संचालक मंडळाच्या वतीने “सायकल बँक ” हा नवीन उपक्रम हाती घेतला आहे, शहरातील दानशूर व्यक्तींना आव्हान करण्यात येते कि आपल्या कडील जुनी, वापरात नसलेली व वापरा योग्य सायकल आदर्श मैत्री फाऊंडेशनच्या ” सायकल बँकेस ” दान करा. ती सायकल आम्ही ग्रामीण भागातील मैलोन मैल चालत शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींना मोफत देणार आसुन,यातून ग्रामीण भागातील गरीब होतकरू विद्यार्थ्यास मोठी मदत होईल. त्यांचा शाळेत येण्या जाण्याचा वेळ वाचेल, अनेक मुलींना शाळा गावापासून दूर आहे, चालत जाणे शक्य नाही म्हणून पालक शाळेत पाठवत नाहीत. अशा मुलींना सायकल मुले दररोज शाळेत जाणे शक्य होईल. म्हणजेच शिक्षणासाठी धड्पणाऱ्या विद्यार्थ्याच्या पंखांना आपल्या मदतीमुळे बळ मिळेल. या साठी आपण आपल्या कडील जुन्या किंवा नवीन सायकल “सायकल बँकेस “दान कराव्यात त्या साठी संस्थेचे अध्यक्ष संतोष बिराजदार मो 9168222333, संचालक प्रवीण सूर्यवंशी मो 9075355565 , अविष्कार हालसे मो 9623924000 महेश शिंदे मो 8888385944 या क्रमवार संपर्क साधावा. आम्ही आपल्या घरून सायकल संकलित करू, व गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहच करू. शिवाय शाळेत चालत जाणारे गरीब व होत करू विद्यार्थी आपल्या निदर्शनास आल्यास त्यांची माहिती हि आमच्या संचालक मंडळास द्यावी असे आव्हान आदर्श मैत्रीफाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार, संचालक प्रा शिवराज मोटेगावकर , तुकाराम पाटील,शशिकांत पाटील, शिवाजी हांडे , निलेश राजमाने, प्रा. ओमप्रकाश झुरळे, राजेश मित्तल , अविनाश सातपुते , असिफ शेख , प्रमोद भोयरेकर , राघवेंद्र इटकर , अरविंद औरादे ,इ संचालक मंडळांनी केले आहे.
