आनंदयात्री- डॉ. अच्युत बन

0
520

*कलावंतांच्या जात कुळातील आनंद यात्री*

*डॉक्टर* :*अच्युत प्रसाद बन*

निजामी राजवटीतून मराठवाडा मुक्त झाल्यानंतर १९४८नंतर नांदेड शहरात विविध डॉक्टर्स आपली सेवा देण्यास प्रारंभ केला होता हळूहळू त्याचे रूपांतर म्हणायचे तर नांदेड शहरात डॉक्टर लेन हा परिसर वैद्यकीय व्यवसायाने व्यवसाय ज्याने दिसून येत आहे अशा व्यापक वैद्यकीय व्यवसायाच्या लेन मध्ये आपली वेगळी छाप ओळख निर्माण करून वैद्यक व्यवसाय मोठ्या जिद्दीने वाढविला व आपले नाव विशिष्ट पातळीवर नेऊन अग्रगण्य केले आहे असे डॉक्टर अच्युत प्रसाद बन होत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही

*अंधकारापुढे न चलवे वाट* *लागतील खुंट काटे अंगा* *एकला नि:संग फाकती अंगा* *एकला नि:संग फाकती मारग* *भिती नव्हे लाग चालावया *तुका म्हणे वाट दाऊनी *सदगुरू राहील हा दुरू पांडूरंग*

या ओळीशी नाते सांगणारा माणूस म्हणजे डॉक्टर अच्युत बन आहे आहेत कारण माता-पित्याची स्मृती अनेक जण पारंपारिक पणे जगतात पण डॉक्टर बन यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ विविध पुस्तकांचा तसेच व्यक्तीचा गौरव करण्याचा उपक्रम सुरू ठेवला आहे तो एक सर्जनात्मक आहे आदरांजली वाहण्याची त्यांची पद्धत नक्कीच स्तुत्य आहे. असे वाटते डॉक्टर बन हे नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र मौजे होटाळा तालुका नायगाव जि नांदेड हे त्यांचे मुळगाव प्रसाद बन होटाळकर यांचे ते पुत्र डॉक्टर बन यांचा जन्म ०१ ऑगस्ट १९६१ रोजी होटाळा येथे झालेला घरची प्रतिकूल परिस्थिती असताना त्यानी प्राथमिक शिक्षण नायगाव तसेच माध्यमिक नांदेड घेतले पुढे प्रसाद महाराजांनी अच्युत बन यांना एम बी बी एस अभ्यासक्रमासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे पाठविले एका खेड्यातला मुलगा डॉक्टर होतो हे त्या काळी मोठी अभिमानाची गोष्ट होती पुढे ही तो अभिमान डॉ. अच्युत बन यांनी आपल्या वैद्यक कार्यातून सिद्ध करीत आले आहेत. यानंतर डॉक्टर वर्षा गोस्वामी यांच्याशी विवाहबद्ध होऊन त्यांनी काही काळ सरकारी नोकरी तर काही काळ खाजगी क्षेत्रात कार्य करीत नांदेडला स्थिर झाले. १९८८ सालीछोट्याशा जागेत दवाखाना थाटून वैद्यक सेवा देण्यास प्रारंभ केला पुढे आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी विस्तार केला त्यांना पत्नी डॉ. वर्षा यांची मदत होती म्हणून नांदेड येथे प्रसाद रुग्णालय, वर्षा पॅथॉलॉजी लॅब अशी वैद्यक व्यवसाय व्यापक केला वैद्यकीय व्यवसाय करीत असताना त्यांनी समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेने सामाजिक, रचनात्मक भान जपले आहे त्यातूनच त्यांनी प्रसाद बन ,व मातोश्री पद्मीनबाई प्रतिष्ठानची स्थापना इसवी सन २००० मध्ये केली त्यानंतर त्यांनी २००४ मध्ये पद्मीनबाई सार्वजनिक वाचनालयाची लोकार्पण करून ग्रंथ वाचनाचे द्वार सर्वसामान्यांसाठी खुले केले. तसेच या काळात त्यांची खेळ व योगाच्या आवडी व छंदा नुसार त्यांनी लघु क्रीडा संकुलाची निर्मिती केली. त्यांना पर्यटनाची आवड असल्याने त्यांनी ५२ देशाचा प्रवास केला आहे. भटकंतीनुसार प्रवास वर्णन पर १८ पुस्तकांचे लेखनही त्यांच्या हातून झाले आहे त्यांना विविध प्रकारचे सन्मान आजतागायत मिळाले आहेत.

यामध्ये राज्य शासनाचा वाडःमय पुरस्कार, मराठी वांडःमय परिषद बडोदे गुजरात चा उत्कृष्ट वाडःमय पुरस्कार तसेच अभिरुची पुरस्कार मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे या संस्थेचा साहित्य पुरस्कार, आणि अंकुर साहित्य पुरस्कार, लोकसंवाद आदी पुरस्कारानी ते सन्मानित झाले आहेत त्यांची ग्रंथसंपदा विपुल आहे .

डॉ. बन हे व्यासंगी आणि रसिक, साहित्यिक व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्या हातून साहित्यविषयक लिखाणाचे सामाजिक कार्य हातून झाले आहे.

साहित्य, कला, निसर्ग आणि लोकजीवनाशी प्रामाणिक आस्था जपणारे डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती आहे.

डॉ. बन हे तीन दशकाहून अधिक काळ नांदेड येथे वैद्यकीय सेवा पार पाडत असताना त्यांनी माता-पित्याची स्मृती सतत जपली आहे. सामाजिक भान निष्ठेने जपले आहे. पुढे मधुमेह , ह्रदयरोग, अॅनेमिया ची आरोग्य विषयक शिबिराचे आयोजन केले .वैदक व्यवसाय करत असताना समुपदेशन, प्रबोधन, आणि लेखन या प्रांतात लीलया संचार केला आहे नांदेडच्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉ.अच्युत बन आणि डाॅ.वर्षा बन हे दांपत्य सामाजिक भान जपणारे वैद्यक व्यवसायी म्हणून सर्वत्र सुपरिचित झाले आहेत.हि परंपरा अमित आणि अनुज पुढे नक्कीच जपतील असा विश्वास आहे.

कलावंत जातकुळीआनंद यात्री अच्युत बन यांच्या वयाचे साठ वर्ष पूर्ण झाली आहेत.

त्यांच्या पुढील प्रवासास मनापासून शुभेच्छा

🌹🌿🌹🌿🌹

*प्रा.महेश कुडलीकर*    

    *देगलूर*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here