*आमदार निलंगेकर यांनी केली पाहणी*

0
301

भारतीय जनता पार्टीचे नेते माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मांजरा नदीच्या काठावरील उजेड, डोंगरगाव, ढोबळेवाडी भागातील शेतीच्या नुकसानीची पाहणी केली…

निलंगा,(प्रशांत साळुंके)- अस्मानीअतिवृष्टीमुळे, मानव निर्मित मांजरा ,तेरणा नदीला आलेल्या महापुरामुळे शेतकरी बांधव संकटात सापडलेले आहेत. मतदारसंघातील उजेड, डोंगरगाव व ढोबळेवाडी येथे शेती व घरांच्या नुकसानीची पाहणी माजी पालकमंञी तथा आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केली.

यावेळी शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधताना माजी पालकमंञी तथा आ. संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले की, नदीकाठच्या जनतेवरचे आलेले संकट आहे, हे संकट मानवनिर्मित असून या जिल्ह्याचे पालकमंत्री वेळीच खबरदारी घेऊन, हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आम्ही केलेल्या मागणीप्रमाणे तेरणा व मांजरा नदीतले पाणी पावसापूर्वी टप्प्याटप्प्याने सोडले असते तर, ही वेळ हे संकट नदीकाठच्या शेतकऱ्यावर जनतेवर आले नसते नदीकाठच्या शेतकऱ्याचे माती सह पिके वाहून गेली नसती. पालकमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे शंभर टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने सरसकट सर्व शेतकर्‍यांना हेक्‍टरी किमान 75 हजार रुपये अनुदान देणे अत्यंत आवश्यक असून ,नियमाप्रमाणे विमा देखील जास्तीत जास्त मिळून दिला गेला पाहिजे. त्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून वेळ पडल्यास शासन विरोधात आंदोलन करण्याची माझी भूमिका आहे त्यामुळे शेतकरी त धीर सोडू नये. भाजपाचे नेते सर्व ताकदीने शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे आहेत. नुकसान भरपाई बाबत शासन दरबारी पाठपुरावा करून मदत मिळवून देण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. असे अभिवचन अतिवृष्टीने शेतीचे व पिकाचे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिले .

यावेळी शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शेषराव ममाळे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले,धोंडीरामजी सांगवे, ऋषिकेश बद्धे,गणेश सलगरे, प्रल्हाद मोहिते,गणेश धुमाळे बेंबळे दाजी, गणेश मोहिते आदी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here